नाशिक प्रतिनिधी - चार ते पाच दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एक तरुण दुगारा नद
नाशिक प्रतिनिधी – चार ते पाच दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एक तरुण दुगारा नदीत बुडाल्यानंतर बेपत्ता झाल्याने वन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या वीकेंडपासून दुपारी तीनपर्यंतच पर्यटकांना निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार आहे. हरिहरगड, दुगारवाडीसह अंजनेरीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह वन विभागाने या सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमला आहे.
दुगारवाडीत तरुण बेपत्ता झाल्यानंतर वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. अंजनेरी गडावर पर्यटकांची संख्या वाढल्यास प्रवेश नाकारण्याच्या सूचना नाशिक पश्चिमच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली गाडे यांनी दिल्या आहेत. प्रत्येकाची नोंदणी करून मर्यादित पर्यटकांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वन पथकांसह संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दुर्घटना टाळण्यासाठी दुपारी तीननंतर पर्यटकांना प्रवेश न देण्यासह, असलेल्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदेशांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर
नोंदणीकृत पर्यटकांनाच प्रवेश मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई
धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मज्जाव गाणी वाजविणारे, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे जंगल क्षेत्रासह गड-किल्ल्यांवर रात्री मुक्कामास बंदी सांदण दरीसह डोंगरांवर ट्रेकिंग बंद
COMMENTS