Homeताज्या बातम्यादेश

विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरले ‘इंडिया’

काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती

बंगळुरू/वृत्तसंस्था ः विरोधकांनी आपल्या पक्षांची वज्रमूठ बांधण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू येथे दोन दिवसीय परिषद ठरवण्यात आली होती. या परिषदेत मंग

एसटी बस कंडक्टरच्या तिकिटाच्या पेटीची चोरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल

बंगळुरू/वृत्तसंस्था ः विरोधकांनी आपल्या पक्षांची वज्रमूठ बांधण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू येथे दोन दिवसीय परिषद ठरवण्यात आली होती. या परिषदेत मंगळवारी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याची माहिती काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. यासोबतच त्यांनी त्याचा फुल फॉर्म सांगतांना म्हटले आहे की, इंडियन, नॅशनल, डेव्हलपमेंटल, इन्क्लुसिव्ह अलायन्स असा आहे.

भाजपचा पराभव करण्यासाठी आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठी 26 पक्ष एकत्र आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही विरोधी पक्षांची आघाडी हे भारताचे प्रतिबिंब असल्याचे ट्विट केले आहे. ठगऊ ने भारताचे पूर्ण रूप सांगितले. इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी. आरजेडीने यासोबत लिहिले – आता पंतप्रधान मोदींना इंडिया म्हणतांनाही त्रास होईल. दरम्यान, काँग्रेसला सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे असे वाटते. याचे कारण म्हणजे सोनिया या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्या असून त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारही नाहीत. पाटणा येथे झालेल्या बैठकीत नितीशकुमार यांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव काही लोकांनी मांडला होता. यावर सर्व पक्षांचे एकमत असेल तर काँग्रेसही ते मान्य करेल. 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी संयोजक बनवले जाणार आहेत. कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणती भूमिका मांडायची यासाठी स्वतंत्र गट तयार केले जातील आणि ते ठरवतील. कॉमन मिनिमम प्रोग्रामबाबतचा निर्णयही तसाच असेल.

सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये रस नाही ः काँग्रेसची भूमिका – काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये कोणताही रस नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांच्या बैठकीत खरगे बोलत होते. काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काहीही रस नाही. सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नाही. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय आदींचे संरक्षण करणे हा आमचा मूळ उद्देश आहे, असे खरगे म्हणाले.

COMMENTS