Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांच्या उजळणी पाढे उपक्रमास प्रतिसाद

बीड प्रतिनिधी - कोरोना काळात झालेले अभ्यासक्रमाचे नुकसान भरून काढण्यासाठी बीड तालुक्यात उजळणी व पाढे हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे या

पत्नीऐवजी दिला भलत्याच पुरुषाचा मृतदेह | LOK News 24
मॉडेल स्कूलच्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद 
पुण्यात डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन

बीड प्रतिनिधी – कोरोना काळात झालेले अभ्यासक्रमाचे नुकसान भरून काढण्यासाठी बीड तालुक्यात उजळणी व पाढे हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांनी मागील शैक्षणिक वर्षात सुरू केला. त्यास चालू शैक्षणिक वर्षातही उदंड प्रतिसाद मिळत असून विविध शाळांमधील विद्यार्थी पाढे तोंडपाठ म्हणत आहेत, अशी माहिती टकेाळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे तसेच गटविकास अधिकारी अनिरुद्र सानप यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू केल्याचे टेकाळे म्हणाले.
गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांनी जुलै 2022 पासून तालुक्यात उजळणी व पाढे यांचा सराव घेण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. कोरोना काळात गणित या विषयाकडे झालेले दुर्लक्ष व यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघावे असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे टेकाळे यांनी म्हटले आहे. यामुळे गणित विषयाची आवड निर्माण होऊन गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. आपल्या भेटींदरम्यान टेकाळे या उपक्रमाचा वारंवार आढावा घेत असतात. त्यांच्या पाहणीत विद्यार्थी पाढे पाठांतर करत असून गणिताची गुणवत्ता वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शुक्रवारी (दि.14) लिंबागणेश केंद्रातील कोंबडवस्ती येथे टेकाळेंनी भेट दिली असता येथील विद्यार्थ्यांनी 30पर्यंत पाढे सादर केले. यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शेवटच्या तासिकेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविल्याने मुलभूत गणिती क्रिया सोप्या होत असून गुणवत्तेत वाढ होत आहेे.

COMMENTS