Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात  थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल अनेमिया  रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन-डॉ.साबळे

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील थॅलेसिनिया  असणार्‍या रुग्ण नातेवाईकांची मागणी अनेक दिवसांची होती. आम्हाला स्वतंत्र कक्षाची उभारणी जिल्हा रुग्णा

सोलापूरातील 3 सराईत गुन्हेगाराना केले तडीपार ..| माझं गावं माझी बातमी | LokNews24 |
आजपासून अहमदनगर निर्बंधमुक्त, कोरोना नियमांचे उल्लंघन मात्र भोवणार
ओबीसी आरक्षण : इम्पॅरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार….

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील थॅलेसिनिया  असणार्‍या रुग्ण नातेवाईकांची मागणी अनेक दिवसांची होती. आम्हाला स्वतंत्र कक्षाची उभारणी जिल्हा रुग्णाण्यात असावी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या विभाग प्रमुख डॉक्टर संजय राऊत यांच्या देखरेखी खाली आज जिल्हा रुग्णालय वॉर्ड 6  मध्ये चार बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आता या रुग्णांची हेळसांड नक्कीच थांबणार आणि त्यांना दर्जेदार उपचार मिळणार. जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी मोफत सुविधा दिली जाते. अशा रुग्णांना नेहमीच रक्त पुरवठा करावा लागतो. त्यांच्यावर उपचार वेळोवेळी ला करावे लागतात त्यासाठी सर्व काही औषध पुरवठा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
 बीड जिल्हा रुग्णालय गेल्या अनेक दिवसापासून रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा औषध साठा उपलब्ध केलेला आहे. जिल्हा  रुग्णालयात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार होण्यासाठी प्रत्येक वॉर्ड विभाग अधिकारी कर्मचारी  नियुक्ती करण्यात आली आहे. आज बीड जिल्ह्यातील   थॅलेसिमिया  असणार्‍या रुग्णांसाठी  वार्ड क्रमांक सहा मध्ये स्वतंत्र  कक्ष स्थापन  करून उद्घाटन  करताना. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, विभाग प्रमुख डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर  सुधीर राऊत, मेट्रन रमा गिरी, वार्ड ईचार्ज अनिता धांडे, वंदना राजपूत, अनिता खरमाटे, शीला मुंडे, राजश्री कांबळे, माने, वाघमारे मामा आदींची उपस्थिती होती.

COMMENTS