बीड प्रतिनिधी - अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी महामार्गावर बीड तालुक्यातील नेकनुर ते मांजरसुभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमो
बीड प्रतिनिधी – अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी महामार्गावर बीड तालुक्यातील नेकनुर ते मांजरसुभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनांचे चाक त्यात अडकुन अपघांतचे प्रमाण वाढले होते, संबंधित प्रकरणात वारंवार तक्रार निवेदने दिल्यानंतर थातुरमातुर भेगा दुरुस्तीचे काम करण्यात येई मात्र काही दिवसांनी पुन्हा भेगा पडलेल्या असायच्या यामुळे केवळ भेगा दुरुस्ती नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली होती यासाठी दि.25 जुन 2023 रोजी गवारी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना लेखी निवेदन दिले होते. निवेदन तसेच आंदोलनानंतर एच.पी.एम.इन्फ्रा.एल.एल.पी.कं.कडुन केवळ थातुरमातुर भेगा बुजवून वेळ मारून नेली जात असे.कालांतराने पुन्हा भेगा पडलेल्या असत यामुळे डॉ.गणेश ढवळे यांनी दि.25 जुन रोजी गवारी फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आदल्या दिवशी दि.24 जुन रोजी रस्त्याचे काम सुरू झाले असून भेगा बुजवून नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती काम सुरू झाले आहे त्यामुळे भविष्यात संभाव्य अपघातांची मालिका खंडित होईल.
COMMENTS