Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द्वारकादास मंत्री बँकेने घेतला मालमत्तेचा ताबा

कर्जाची परतफेड करण्यास सरोज गांधी, सुवेंद्र गांधी, मांगीलाल गांधी ठरले अपयशी

अहमदनगर/प्रतिनिधी ः.बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. बीड यांनी देवेंद्र मार्केटिंग एजन्सीचे. संचालक श्रीमती सरोज दिलीप गांधी, सुव

तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोडीच्या घटनाची नोंद 
मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती असावी ः प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे
कृष्णानंद महाराज यांचे कार्य देवस्वरूपी ः मेजर सैंदोरे

अहमदनगर/प्रतिनिधी ः.बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. बीड यांनी देवेंद्र मार्केटिंग एजन्सीचे. संचालक श्रीमती सरोज दिलीप गांधी, सुवेन्द्र दिलीप गांधी आणि मांगीलाल कनकमल गांधी यांना व्यवसाय वाढीसाठी बँकेने नजर गहाण कर्ज 22 फेबु्रवारी 2005 साली 35 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. कर्जाची व्याजाची रक्कम न भरल्यामुळे द्वारकादास मंत्री बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सरफेसी कायद्यांतर्गत मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे.
याबाबत बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र मार्केटिंग एजन्सी यांना व्यवसाय वाढीकरिता द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने सन 2005 मध्ये 35,00,000/- रुपये (अक्षरी रुपये पस्तीस लाख) नजर गहाण कर्ज दिले होते. कर्जाची रक्कम देवेंद्र मार्केटिंग एजन्सी यांनी मुदतीत भरणे आवश्यक होते. देवेंद्र मार्केटिंग एजन्सीचे संचालक यांनी घेतलेले कर्ज भरणा करण्यासाठी बँकेचे मॅनेजर, वसुली अधिकारी व कर्मचारी यांनी वारंवार लेखी नोटीस दिल्या व समक्ष पाठपुरावा देखील केला, परंतु देवेंद्र मार्केटिंग एजन्सीने काही व्याजाची रक्कम भरणा केली. पुढील काळात व्याज थकवले सदरील कर्ज एनपीएमध्ये गेले. त्याकरिता बँकेचे उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी देखील देवेंद्र मार्केटिंग एजन्सीच्या संचालक यांचेशी वारंवार संपर्क साधला असता, नकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या कारणाने बँकेने पुढील कायदेशीर कार्यवाही करत सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अ‍ॅण्ड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट अ‍ॅक्ट 2002 केंद्रीय कायदा 2002 नं. 54 चे अंतर्गत प्राधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याचे कलम 13 (2) अन्वये तसेच उक्त नियमाच्या नियम 3 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 20 मार्च 2023 रोजी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि. बीड शाखा चौपाटी कारंजा, अहमदनगरचे कर्जदार देवेंद्र मार्केटिंग एजन्सी चे संचालक श्रीमती सरोज दिलीप गांधी, सुवेन्द्र दिलीप गांधी, मांगीलाल कनकमल गांधी यांना नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु.3,52,15,458.00 त्यावर दिनांक 20 मार्च 2023 पासून पुढे होणारे व्याज 60 दिवसाच्या आत भरणा करण्यासाठी मागणी नोटीस देण्यात आली होती. सदरील मुदत संपल्यानंतरही बँकेचे अधिकार्‍यांनी कर्ज रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा केला परंतु देवेंद्र मार्केटिंग एजन्सीचे संचालक सरोज दिलीप गांधी, सुवेन्द्र दिलीप गांधी मांगीलाल कनकमल गांधी यांनी वरील नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेचा भरणा न केल्यामुळे बँकेने आपले मालमत्तेचा ताबा घेण्यात येईल या आशयाची नोटीस कलम 13 (4) देखील देवेंद्र मार्केटिंग एजन्सीचे संचालक सरोज दिलीप गांधी, सुवेन्द्र दिलीप गांधी, मांगीलाल कनकमल गांधी यांना 02 जून 2023 रोजी दिली तरीही देवेंद्र मार्केटिंग एजन्सी चे संचालकांनी याची दखल घेतली नाही व कर्ज बाकी भरली नाही म्हणून सरफेसी कायद्याचे नियम 8 (1) अधिकाराचा वापर करून नाविलाजाने बँकेने कर्जाची वसुलीसाठी मांगीलाल कनकमल गांधी यांनी बँकेत नोंदणीकृत गहाणखत करून दिलेली मालमत्तेचा अहमदनगर शहर, तापकीर गल्ली येथील सिटी सर्व्हे नं. 3116ब, व सिटी सर्व्हे नं. 3117 घर नं. 2196 मधील देवेंद्र मार्केटिंग एजन्सी चे संचालक मांगीलाल कनकमल गांधी यांच्या मालमत्तेचा दिनांक 12 जुलै 2023 रोजी बँकेने प्रतिकात्मक ताबा घेतलेला असल्याची माहिती बँकेचे प्राधिकृत अधिकारी प्रशांत बोदार्डे यांनी दिली आहे. यावेळी बँकेचे शाखाधिकारी, वसुली कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS