Homeताज्या बातम्यासंपादकीय

अतिवृष्टीचा प्रकोप आणि तापमानवाढ

देशातील उत्तरेकडील राज्यात अतिवृष्टीचा प्रकोप बघायला मिळत आहे. या प्रकोपात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आजची परिस्थिती प

प्रशासकराज कधी संपणार ?
मध्यप्रदेशात भाजपचे ओबीसी कार्ड
राजकारणाचा खरा चेहरा

देशातील उत्तरेकडील राज्यात अतिवृष्टीचा प्रकोप बघायला मिळत आहे. या प्रकोपात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आजची परिस्थिती पाहिल्यास पावसाचे असमान वितरण बघायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यात मुसळधार पावसाने सीमा ओलांडली आहे, त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे, त्याबरोबरच शहरामध्ये अनेक घरे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यासोबतच महाराष्ट्रासारख्या राज्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. मुंबई, पुण्यासारखे शहरे आणि विदर्भातील काही जिल्हे सोडले तर महाराष्ट्रात पुरेसा पाऊस झालेला नाही, आणि पेरण्या देखील 20-30 टक्क्यांच्या पुढे सरकू शकलेल्या नाहीत. त्यामुळे देशात सध्या पर्जन्याचे असमान वितरण दिसून येत आहे. त्याला कारणीभूत आहे तापमानवाढ. तापमानवाढीमुळे पाऊस वेळेवर पडतांना दिसून येत नाही. पाऊस आला तर, तो काही तासांमध्ये पाऊस् पडून मोकळा होतो, त्यामुळे पूर, ओला दुष्काळ सारखी परिस्थती निर्माण होते. मात्र या सर्व बाबींना टाळण्यासाठी वनांचे आच्छादन आपल्याला वाढवावे लागणार आहे. जे आच्छादन 33 टक्के असायला हवे ते केवळ 20-22 टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे वनांचे आच्छादन आणि तापमानवाढ रोखण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आजमितीस देशाने लोकसंख्या 143 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढ वेगाने होत आहे, त्यातच या लोकसंख्येचा गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्‍वत विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतांना दिसून येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये 41 वर्षांनंतर सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यासोबतच युमना नदी धोक्याची पातळी ओलांडतांना दिसून येत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता, सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. वनस्पती, झाडे हा कार्बनचा प्रमुख स्त्रोत आहे. वनस्पती झाडे कार्बन स्टोर करून ठेवतात आणि मानवाला ऑक्सिजन देतात, मात्र वनांची संख्या कमी झाल्यामुळे कार्बन शोषून घ्यायला मोठ्या प्रमाणावर वृक्षच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन देखील मानवाला कमी मिळतांना दिसून येत आहेे. झाडे कार्बनचा प्रमुख स्रोत आहेत. असा अंदाज आहे की अ‍ॅमेझॉनमधील कार्बनचे प्रमाण मानवी उत्पादनाद्वारे सोडल्या जाणार्‍या दहा वर्षांच्या कार्बनपेक्षा जास्त आहे. जंगलतोडीमुळे, प्राणी बर्‍याचदा आपले निवासस्थान गमावतात आणि वनस्पती कमी प्रमाणात होते. जंगलतोड झाल्यावर निवास व्यवस्था नष्ट होणे सामान्य आहे.कारण, केवळ झाडे तोडली जात नाहीत तर पूर्वी राखलेल्या जमिनीतील झाडे झाडाच्या संरक्षणाच्या अभावामुळे उद्धरण आवश्यक संरक्षण न मिळाल्यामुळे मातीची तीव्र झीज करतात. ज्या ठिकाणी वृक्षांचे संरक्षण झाले आहे, अशा ठिकाणी उच्च तापमानामुळे प्राण्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी बाधित होतांना दिसून येत आहे. 2 फेबु्रवारी 1971 च्या रामसर करारामुळे पाणथळ प्रदेशाचे संवर्धन करण्यात येत आहे. त्यासाठी त्या त्या देशांतील स्थळांची यादी जाहीर करून, त्या प्रदेशाचे संवर्धन करण्यात येत आहे. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत. तर त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखून, भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार आहे. आजमितीस भारताचे भूक्षेत्रफळ बघितले असता, या प्रदेशात केवळ 40 कोटी जनताच असायला हवी होती, मात्र अतिरिक्त 100 कोटींचा भार आपण वागवतांना दिसून येत आहे. त्यामुळे निसर्गाचा स्फोट होतो, आणि अशा आपत्ती येतात. प्रदूषण वाढत आहे, जंगलाची सिंमेटे वाढत चालली आहे. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत चालली आहे. त्यामुळेच पूर, अतिवृष्टी अशा समस्यांना आता दरवर्षी तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवाचे आतातरी शाश्‍वत विकासाचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करायला हवी, तरच आपण पुढच्या पिढ्यांना चांगली जीवनशैली देवू शकू.

COMMENTS