Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमाशंकर कडून कल्याण कडे जाणाऱ्या एसटीचा अपघात

पुणे प्रतिनिधी - नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर बुधवारी एसटीचा भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस थेट दरीत कोसळली होती.

वसईत स्कूल बसचा मोठा अपघात.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू
शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी – नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर बुधवारी एसटीचा भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस थेट दरीत कोसळली होती. ४०० फूट दरीत कोसळलेल्या याबसमधील एक जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले होते. नाशिकमधील ही घटना ताजी असताना पुन्हा गुरुवारी बसचा अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एसटी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने ही एसटी बस जात होती. एसटी बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली. गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस २० फूट खोल ओढ्यात कोसळली. या एसटी बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. यामधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये बुधवारी एसटीला भीषण अपघात झाला होता. सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तर १८ ते २० प्रवासी जखमी झाले होते. जखमी प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

COMMENTS