पोलिस उपनिरीक्षकांना सौजन्याचे वागण्याचे धडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस उपनिरीक्षकांना सौजन्याचे वागण्याचे धडे

पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या उपनिरीक्षकांना सौजन्याने वागण्याचे धडे दिले जाणार आहेत. पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन उपनिरीक्षकांना योग्य वागणुकीचे धडे देण्याच्या सूचना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत.

देवळयात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर ग्रामीण पोलीसांची धाड 
जातनिहाय जनगणनेला अटींसह संघाचा पाठिंबा
ठाकरे गटाला हादरे शिवसेनेसह धनुष्यबाण शिंदे गटाला

मुंबई / प्रतिनिधीः पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या उपनिरीक्षकांना सौजन्याने वागण्याचे धडे दिले जाणार आहेत. पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन उपनिरीक्षकांना योग्य वागणुकीचे धडे देण्याच्या सूचना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. शिवाय उपनिरीक्षकांच्या वागणुकीबद्दल तक्रार आल्यास त्यांच्याबरोबर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

नाशिक येथून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवळपास तीनशे उपनिरीक्षकांची प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. तरुण रक्त आणि पहिल्यांदाच वर्दी घातल्याने या उपनिरीक्षकांकडून सार्वजनिक ठिकाणी चुकीचे वर्तन घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस दलातील जनमाणसांतील प्रतिमा मलीन होऊ शकते. शिवाय पोलिस ठाण्यातील काम प्रत्यक्षात कसे चालते, याचा या उपनिरीक्षकांना काहीच अनुभव नसतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे वागणूक योग्य नसल्याच्या तक्रारी येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी या सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनाकाळ सुरू असून नियम मोडणार्‍यांवर पोलिस कारवाई करतात. ही कारवाई करताना मुले, वृद्ध विशेषतः महिला यांच्याशी या पोलिसांनी सौजन्याने वागायला हवे. यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवून मार्गदर्शन करावे, अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहे. पोलिस दलाचे नाव आणि प्रतिमा कशी उंचावेल, अशा प्रकारचे काम या नव्या उपनिरीक्षकांकडून करून घ्यावे, असेही आदेशात नगराळे यांनी म्हटले आहे. पोलिस उपायुक्त आपल्या हद्दीतील पोलिस ठाण्यांना नियमित भेटी देत असतात. त्याचप्रमाणे नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देऊन उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तांंनी नवीन उपनिरीक्षकांना मार्गदर्शन करावे. या पोलिसांचा ऑनलाइन दरबार घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि गैरवर्तवणुकीपासून त्यांना परावृत्त करावे, असेही नगराळे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. उपनिरीक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येईल, असे आयुक्तांनी बजावले आहे.

COMMENTS