माथेरानमधील पर्यटन उद्यापासून सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माथेरानमधील पर्यटन उद्यापासून सुरू

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या टक्केवारीत सातत्याने घट होत आहे; तसेच ऑक्सिजन खाटा रिकाम्या राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

lonand : विवाहितेच्या आत्महत्येनंतर कोपर्डे तालुका खंडाळा येथे तणावाचे वातावरण.
संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध
पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम | LOK News 24

अलिबाग / प्रतिनिधीः रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या टक्केवारीत सातत्याने घट होत आहे; तसेच ऑक्सिजन खाटा रिकाम्या राहण्याचे प्रमाण वाढत आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. या ठिकाणी तिसर्‍या गटातील निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यानुसार हॉटेल आणि अन्य सुविधा मर्यादित प्रमाणात सुरू राहणार असून, माथेरानमधील पर्यटनदेखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. 

कोरोनाकाळात मुंबई-पुण्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर गेल्या आठवड्यात अनेक पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली होती; मात्र निर्बंध गटाचे कारण देऊन पर्यटनास बंदी घालण्यात आली होती. यावर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला होता. गेल्या महिनाभरापासून माथेरानमध्ये एकही नवा कोरोनारुग्ण आढळलेला नाही; तसेच 95 टक्के माथेरानवासींचे लसीकरण पूर्ण झाले. माथेरानवासीयांचा रोजगार केवळ पर्यटकांवर अवलंबून असल्याने पर्यटन सुरू करण्याची जोरदार मागणी होत होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्यटनास मुभा दिल्याने रोजगार पुन्हा सुरू होणार असून, माथेरान पुन्हा गजबजणार असल्याने स्थानिकांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे.

COMMENTS