Homeताज्या बातम्यादेश

बेंगळुरू टेक फर्मच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकाची माजी कर्मचाऱ्याकडून हत्या

बेंगळुरू - बेंगळुरूमध्ये एका टेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एका माजी कर्मचाऱ्याने कथितरित्या हत्या केल्याच

कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
तलाठी कार्यालयातच केला तलाठ्याचा खून
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

बेंगळुरू – बेंगळुरूमध्ये एका टेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एका माजी कर्मचाऱ्याने कथितरित्या हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्यालयात असताना माजी कर्मचाऱ्याने दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही व्यक्ती एरोनिक्स इंटरनेट कंपनीचा माजी कर्मचारी होता. त्याने एमडी फणींद्र सुब्रमण्य आणि सीईओ विनू कुमार यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला. सध्या दोघांवर हल्ला करणारा फेलिक्स नावाचा माजी कर्मचारी फरार असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खुनाच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आरोपी फेलिक्स आधी एरोनिक्स इंटरनेटमध्ये काम करायचा. ती नोकरी सोडून त्याने स्वतःची टेक कंपनी सुरू केली. मात्र, जुन्या कंपनीमधील वरिष्ठ लोक त्याच्या व्यवसायात अडथळा आणत होते. या कारणामुळे फेलिक्सचा त्यांच्यावर खूप राग होता. रागाच्या भरात त्याने मंगळवारी कंपनीच्या कार्यालयात तलवार घेऊन घुसून फणींद्र व वीणू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळ काढला

COMMENTS