Homeताज्या बातम्यादेश

एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू

दिल्ली-मेरठ वेवर स्कूल बस आणि कारचा अपघात

गाझियाबाद/वृत्तसंस्था ः दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर उत्तरप्रदेशाच्या गाझियाबादमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आ

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 15 जण जखमी
भरधाव वेगातील कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
राजधानी दिल्लीत भीषण अपघात

गाझियाबाद/वृत्तसंस्था ः दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर उत्तरप्रदेशाच्या गाझियाबादमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडामध्ये एका खासगी शाळेची बस आणि कारची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी 7 च्या सुमारास नोएडाजवळ हा अपघात घडला.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठे  नुकसान झाले आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीजवळीत गाझीपूर येथील सीएनजी पंपावरुन बस चालकाने गॅस भरला आणि नंतर उलट्या दिशेने त्याने बस काढली. चुकीच्या दिशेने धावणार्‍या स्कूल बसने डणत कारला जोरदार धडक दिली. या कारमधून आठ जण प्रवास करत होते, त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जवळच्या रग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, बसमध्ये फक्त चालकच होता. नोएडाच्या बालभारती शाळेची ही बस होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 8 किलोमीटरपर्यंत बस चुकीच्या बाजूने धावली. प्रेमपाल असे बस चालकाचे नाव असून तो नशेत असल्याची माहितीही समोर येत आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे. अपघातात मृत पावलेले कुटुंब हे मूळचे मेरठचे होते, ते खाटू श्यामच्या दर्शनासाठी निघाले असता कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्येे नरेंद्र यादव (45), त्यांची पत्नी अनिता (42), पहिला मुलगा कार्तिक (15), दुसरा मुलगा हिमांशू (12) बबिता (38) आणि मुलगी वंशिका (7) यांचा समावेश आहे. तर धर्मेंद्र (48) आणि त्यांचा मुलगा आर्यन (8) हे गंभीर जखमी झाले आहेत.

COMMENTS