Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार गट लवकरच परत येणार

आमदार रोहित पवारांचा विश्‍वास

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, अजित पवार गटाने बंड करत, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहे. यावर बोलतांना आमदार रोहित

सिंचन विहिरींसाठी आणि अधिकार्‍यांवरील कारवाई विरोधात आमदार रोहित पवार यांनी दंड थोपटत दिला आंदोलनाचा इशारा
भाजपकडून बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याच काम : Rohit Pawar
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, अजित पवार गटाने बंड करत, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहे. यावर बोलतांना आमदार रोहित पवार म्णाले की, आगामी 10- 15 दिवसांमध्ये अजित पवार गट परत येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँगे्रस फोडली, आता पुढील टार्गेट काँगे्रस असू शकते, असे विधान देखील पवार यांनी केले.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कर्जत- ामखेडचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात आले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार हे परत फिरतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यात शरद पवार यांचे वय काढल्याने 30 ते 40 टक्के लोक हे मागे फिरण्याच्या तयारीत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती ही आमदारांची देखील आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसात बघा काय परिस्थिती राहते असे रोहित पवार म्हणाले. तसेच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुद्धा नंबरसुद्धा लागू शकतो, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले की, राज्यातील भाजपवरील लोकांचा विश्‍वास उडालेला आहे. तेव्हा ते गणित बसवण्यासाठी मत विभाजणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष फोडीचे राजकारण लोकांच्या प्रेमासाठी केलेल नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेल नाही, एका चांगला विचारासाठी केलेला नाही, फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने केलेले आहे. मात्र लोकांना भाजपचा डाव कळून चुकला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजप पक्षाला नकारात्मक भूमिकेतून बघत आहे. त्यामुळे आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला, असे राजकारण सुरु आहे. कुठूनतरी आपल्या हातात सत्ता ठेवणे हाच एकमेव उद्देश भाजप पक्षाचा आहे. येत्या काळात पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करावे लागणार आहे. भाजप पक्षाच्या गलिच्छ विचाराशी लढण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज असून येत्या काळामध्ये  बीजेपीला धडा शिकवायचा आहे, असा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवारांकडून शरद पवार यांचे वय काढले गेले. त्यामुळे त्या बैठकीला असणार्‍या पदाधिकार्‍यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्या बैठकीला अनेक नेते माघारी फिरण्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्याचबरोबर अजित पवारांबरोबर गेलेल्या  आमदारांची तशीच परिस्थिती आहे. जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. या पक्ष फुटीबाबत लोकांमध्ये काय चर्चा आहे, यावरून राजकीय नेत्यांना अंदाज आला असून त्यामुळे पक्षाची बांधणी करत असताना जे आपल्याबरोबर राहिलेले आहेत. त्यांना न्याय देण्याची भूमिका शरद पवार यांची शंभर टक्के राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

COMMENTS