Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांचा केज मतदारसंघावर कसा होणार प्रभाव

आ.नमिताताई मुंदडा यांनी ज्यांच्यामुळे सोडली राष्ट्रवादी त्यांच्याच बाजूला बसण्याची वेळ

अंबाजोगाई प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपा शिवसेनेसोबत संयुक्त सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण हे

इतके कसे निर्दयी, एका सहीसाठी अडवला पोलिसाचा मृतदेह! l LOKNews24
नगर जिल्यातील वयोवृद्धांना मिळणार मोफत साहित्य
चार्जशीटसाठी शासनाकडे मागितली परवानगी ; सिव्हिलमधील आग प्रकरण

अंबाजोगाई प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपा शिवसेनेसोबत संयुक्त सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सहभागी करुन घेतले पण त्यांच्या सत्तेतील सहभागाचा नकारात्मक परिणाम हा खालच्या कार्यकर्ता वर्गावर होत असल्याची भावना आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पुणे येथील भाजप कार्यकर्त्यांने पत्र पाठवून खरपूस समाचार घेतला आहे. अजितदादा पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांचा परिणाम केज मतदारसंघावर सुद्धा होणार आहे. कारण केज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून महाराष्ट्रातील पहिल्या पाच उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. त्या पहिल्या पाचमध्ये नमिताताई मुंदडा यांचा समावेश होता. मात्र स्थानिक राजकारणाला आणि विशेषतः ना.धनंजय मुंडे व त्यांच्या सहकार्यांच्या भुमिकेला कंटाळून मिळालेले तिकिट नाकारुन भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली आणि विजयीसुद्धा झाल्या. गेली चार वर्ष आ.नमिताताई मुंदडा व त्यांचे सर्व कार्यकर्ते हे भाजपात गुण्यागोविंदाने नांदत होते. विकासासाठी शक्य होईल तेवढा पाठपुरावा आणि प्रयत्न सुरु होता मात्र अजितदादांनी सत्तेमध्ये सहभाग घेतल्यानंतर जिल्ह्यातील समीकरणे बदलत आहेत. ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी सोडली त्यांच्या सोबत मुंदडा यांना बसावे लागणार आहे. शिवाय त्यांच्या सोबतच संयुक्त निर्णय घ्यावा लागणार आहे. जो संसार सुखाचा चालु होता त्यामध्ये आता बदल होईल तो कश्या पद्धतीचा असेल हे आज तरी सांगणे अवघड आहे.
केज विधानसभा मतदार संघाने गेल्या 30 वर्षापासून मुंदडा कुटूंबियाना सत्तेची स्थाने दिली आहेत. केवळ 2014 ची निवडणुक वगळता मुंदडा कुटूंबियाचा प्रभाव राहिलेला आहे. विकास कामांच्या माध्यमातून आणि लोकप्रियतेच्य व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी मतदारसंघात आपली बाजू भक्कम केली. 2019 च्या निवडणुकीदरम्यान निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यातील पाच उमेदवारांची नावे सर्वप्रथम जाहिर करण्यात आली होती. त्यामध्ये क्रमांक 1 ला आ.नमिताताई मुंदडा यांचे नाव होते. प्रचाराची रणधुमाळी सुरु होती मात्र पक्षात राहूनच आपला गेम आपलेच सहकारी करतील असा अंदाज आल्याने आ.नमिताताई मुंदडा यांनी जाहिर झालेल्या उमेदवारीला डावलून स्थानिक नेतृत्व आणि राजकारणाला कंटाळून भाजपात प्रवेश घेत भाजपाची उमेदवारी मिळविली. त्याठिकाणी 30 हजार मतांच्या सरासरीने विजयीसुद्धा झाल्या. गेल्या चार वर्षात कोरोनामुळे कामाला थोडी मंदी आली. परंतु सत्ता परितर्वन झाल्यानंतर जवळपास 300 कोटी रुपयांची विकास कामे मंजुर करुन आणली आणि आज मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते हे पूर्णतः सिमेंट रस्ते आणि डांबरी रस्ते करुन झळाळी मिळवून दिली आहे. सर्वकाही सुरळीत सुरु होते विकासाची गंगा सुरु होती मुंदडा कुटूंबिय हे आपल्या परिने आणि कौशल्याने मतदारसंघासाठी भरीव निधी आणीत होते. आणि मतदारसंघाचा विकास साधला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून विरोधक हा घटकच समोर असता कामा नये या भुमिकेतून गतवर्षी शिवसेना फोडली आणि आता राष्ट्रवादी फोडून उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांना शपथ दिली. राज्यात आता शिंदे फडणवीस आणि पवार सरकार अस्तित्वात आले आहे. शिंदे होते तोपर्यंत एक हिंदूत्वाचा विचार म्हणून सर्व काही स्विकारले जात होते. परंतु ज्यांनी आयुष्यभर पुरोगामी म्हणून काम केले आणि सातत्याने त्या काळात भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांना व नेत्यांना त्रास दिला ती नेतेमंडळी ईडीच्या भीतीने आणि सत्तेच्या लालसेने भाजपासोबत आली. परंतु त्यांच्या येण्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रश्न निर्माण झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कसलाही मानसिक त्रास होणार नाही परंतु आज शिवसेना शिंदे गट हा पूर्णतः असस्थ आहे. त्यामध्ये कधीही स्फोट होवू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर तर वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. ज्याना आयुष्यभर विरोध केला किंवा ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला अशी माणसे संगतीला येवून बसली आणि पंगतीला अगोदर जेवून गेली त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिंदे फडणवीस सरकारची कामगिरी चांगल्या पद्धतीने सुरु होती परंतु आता थेट राष्ट्रवादीमध्ये आल्याने पेच वाढला आहे. याचा केज मतदारसंघावर परिणाम येणार्या काळात दिसून येणार आहे. या मतदारसंघाच्या आ.नमिताताई मुंदडा यांनी ज्यांच्या कारनाम्याला कंंटाळून राष्ट्रवादी सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला आज तेच पालकमंत्री म्हणून येणार आहेत. मित्र पक्ष असल्याने ही घडी व्यवस्थित बसेल कि नाही ही चिंता अनेकांना सतावते आहे. ज्यांना विरोध केला तेच जर आता जिल्ह्याचे प्रमुख असतील तर त्याला कशा पद्धतीने तोंड द्याचे हा प्रश्न मुंदडा समोर आहे. गेल्या वेळी मुंदडा आणि राष्ट्रवादी हे प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने होते. परंतु आता ते सोबतीला आल्याने कश्या पद्धतीने सत्तेचा वापर होईल याकडे लक्ष लागले आहे. आ.नमिताताई मुंदडा यांनी ज्यांच्यामुळे पक्ष सोडला त्यांच्यासोबत बसावे लागणार आहे, निर्णय घ्यावे लागणार आहेत. एकूणच देवेंद्र फडणवीसांच्या निती आणि नियतीमुळे कार्यकर्ता वर्गावर मोठा परिणाम आणि आघात झाला आहे. कारण आजवर ज्यांचा विरोध केला आज त्यांच्याच सोबत बसावे लागणार आहे. यामध्ये सत्तेचा लाभ कोणाला किती मिळणार हे सुद्धा महत्वाचे आहे. जसजसे दिवस निघून जातील तसतस संघर्ष पाहवयास मिळेल. फडणवीसांची निती ही तत्वाला आणि विचाराला धरुन नसल्याने कार्यकर्ता वर्गाला वेगवेगळ्या प्रसंगाना आगामी काळात सामोरे जावे लागणार एवढे मात्र खरे…!

COMMENTS