मुंबई : राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरू असताना धनंजय मुंडे यांचं एक व्हिडीओ समोर आला आहे. नुकतंच धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ दिली

मुंबई : राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरू असताना धनंजय मुंडे यांचं एक व्हिडीओ समोर आला आहे. नुकतंच धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ दिली आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत महायुती करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सोशल मीडियावर धनंजय मुंडे याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एरवी राजकीय मैदानात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे शाब्दीक लढा आणि वैचारीक लढा जरी पाहायला मिळत असला तरी आता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी औक्षण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. यासोबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. याचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. त्यातील शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईने माझं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.
COMMENTS