Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

कोल्हापुरातील विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी ः विभागीय शिक्षण सहसंचालकासह (उच्च शिक्षण) स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिक कोल्हापुरात ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकले आहेत. या ति

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच
जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 72 उमेदवार रिंगणात

कोल्हापूर/प्रतिनिधी ः विभागीय शिक्षण सहसंचालकासह (उच्च शिक्षण) स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिक कोल्हापुरात ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकले आहेत. या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना बुधवारी 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई राजाराम कॉलेज परिसरातील विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये करण्यात आल्याने खळबळ उडाली.
हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी पन्नास हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारताना कारवाई झाली. विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) हेमंत नाना कठरे (वय 46, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय 32, रा. पीरवाडी, ता. करवीर) आणि कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय 34, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विभागीय सहसंचालक कार्यालयात विविध कामांसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, प्राचार्य येतात. याठिकाणी कार्यालयामध्ये लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. लाचखोर हेमंत नाना कठरे हा वर्ग एकचा अधिकारी आहे. सांगली जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत नव्याने सुरू केल्या जाणार्‍या हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन अभ्यासक्रमांसाठी या विभागाकडून अभिप्राय द्यावा लागतो. यामध्ये सर्व नियम-अटींची पूर्तता केल्याचा अहवाल देण्यासाठी कठरे यांनी 50 हजार रुपये मागितल्याची माहिती तक्रारदाराने एसीबीकडे दिली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. तडजोडीअंती आज 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना विभागीय शिक्षण सहसंचालक, स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने पकडले. उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या तक्रारीची खातरजमा मंगळवारीही केली होती. आज खुद्द वर्ग एक दर्जाच्या अधिकार्‍याचीही खात्री केली. दुपारी सहसंचालक कार्यालयात सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक जोंग याला पकडले. या रकमेची मागणी सहसंचालक कठरे आणि स्टेनोग्राफर गुरव यांनी केल्याचे स्पष्ट होताच तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भंडारे यांच्यासह विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील आदी कारवाईत सहभागी होते. दरम्यान, लाचखोर अधिकारी वर्ग एकमधील असल्याने त्याच्यासह इतर दोघांना अटक करून त्यांच्या घराची झडती घ्यायची असल्याने एसीबीकडून सांगली विभागातील अधिकार्‍यांनाही कारवाई करण्यासाठी बोलावले होते. मुळ गाव सातारा जिल्ह्यातील असल्याने तेथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हेमंत कठरेच्या घराची झडती घेतली. कोल्हापुरातील अंबाई डिफेन्समधील घराच्या झडतीसह गुरव आणि जोंग यांच्याही घरांच्या झडती घेण्यात येणार आहे.

COMMENTS