Homeताज्या बातम्याक्रीडा

WI दौऱ्यासाठी T20 टीमची घोषणा

टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र
सूर्यकुमार यादव कडून चाहत्याला खास गिफ्ट
सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री

टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 23 जून रोजी कसोटी आणि वनडे सीरिजसाठी संघ जाहीर केला. त्यानंतर आता बीसीसीआयने टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. अजित आगरकर यांची पहिलीच टीम बीसीसीआयने विंडिज विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. अजित आगरकर यांची क्रिकेट सल्लागार समितीने 4 जुलै रोजी निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आगरकर यांनी खेळाडूंची निवड केली. कर्णधारपदी कोण? या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे.  त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक पहिला सामना, 3 ऑगस्ट. दुसरा सामना, 6 ऑगस्ट. तिसरा सामना, 8 ऑगस्ट. चौथा सामना, 12 ऑगस्ट. पाचवा सामना – 13 ऑगस्ट. विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

COMMENTS