पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा देणार पोलिसांना आर्थिक लाभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा देणार पोलिसांना आर्थिक लाभ

पासपोर्टसाठी दाखल झालेल्या प्रकरणांचा वेळेत निपटारा केल्याने पोलिसांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता
बँक बचावची आश्‍चर्यकारक माघार, सहकार वर्चस्वाच्या दिशेने…

अहमदनगर/प्रतिनिधी- पासपोर्टसाठी दाखल झालेल्या प्रकरणांचा वेळेत निपटारा केल्याने पोलिसांना आर्थिक लाभ मिळणार आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेने ही विशेष कामगिरी केली आहे. 21 दिवसांच्या आतमध्ये पासपोर्ट प्रकरणाचा निपटारा केल्यास एका प्रकरणासाठी 150 रुपये पासपोर्ट विभागाकडून पोलिस विभागास देण्यात येतात. नगर जिल्हयात 6754 पासपोर्ट प्रकरणांचा 21 दिवसांच्या आतमध्ये निपटारा केल्यामुळे केंद्र शासनाच्या पासपोर्ट विभागाकडून महाराष्ट्र पोलिस दलास संभाव्य 9 लाख 45 हजार 400 रुपयांचा महसूल मिळणार आहे. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलात सध्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या ई-टपाल प्रणालीचा सुयोग्य वापर करुन 1 ऑक्टोबर 2020 पासून आजपर्यंत पासपोर्ट प्रकरणे 6894 प्राप्त झाली व त्यापैकी 6754 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 60 प्रकरणे 15 दिवसाचे आतील प्रलंबित आहे. 21 दिवसांच्या आतमध्ये पासपोर्ट प्रकरणाचा निपटारा केल्यास एका प्रकरणासाठी 150 रुपये पासपोर्ट विभागाकडून पोलिस विभागास देण्यात येतात, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी प्रलंबित प्रकरणे विहीत वेळेत निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. जिल्हयात अनेक प्रकरणांचे अहवाल पोलिस स्टेशनकड प्रलंबित राहत असत, त्यासाठी पाटील यांनी स्वतः जिल्हा विशेष शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासह जिल्हयातील उपविभागनिहाय बैठका घेऊन विशेष मोहीम राबवली. सध्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या ई-टपाल या प्रणालीचा वापर केला. 1 ऑक्टोबर 2020 पासून आजपावेतो पासपोर्ट प्रकरणे 6894 प्राप्त झाली. त्यापैकी 6754 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 60 प्रकरणे 15 दिवसाचे आतील प्रलंबित आहे. 21 दिवसाचे आतमध्ये पासपोर्ट प्रकरणाचा निपटारा केल्यास एका प्रकरणासाठी 150 रुपये पासपोर्ट विभागाकडून पोलिस विभागास मिळत असल्याने तसेच नगर जिल्हयात 6754 पासपोर्ट प्रकरणांचा 21 दिवसाच्या आतमध्ये निपटारा केल्यामुळे केंद्र शासनाचे पासपोर्ट विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलास संभाव्य 9,45,400 रुपयांचा महसुल मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नगरचे अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक, तसेच पोलिस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा यांनी जिल्हा विशेष शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना देऊन पाठपुरावा करून प्रलंबित प्रकरणांची निर्गती करुन घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अनेक प्रकरणे लागली मार्गी

ऑफलाईन चारित्र्य पडताळणी प्रकरणे 327 प्राप्त झाली. त्यापैकी 274 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 53 प्रकरणे 45 दिवसाचे आतील प्रलंबित आहे. ऑनलाईन चारित्र्य पडताळणी प्रकरणे 9800 प्राप्त झाली, त्यापैकी 9741 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 59 प्रकरणे प्रलंबित आहे. नवीन शस्त्र परवाना प्रकरणे 609 प्राप्त झाली, त्यापैकी 604 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 5 प्रकरणे 45 दिवसाचे आतील प्रलंबित आहे. अनुज्ञप्ती प्रकरणे 997 प्राप्त झाली, त्यापैकी 996 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन 1 प्रकरण 45 दिवसाचे आतील प्रलंबित आहे, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. पेट्रोलपंप प्रकरणे 68 प्राप्त झाले असून सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. स्फोटक परवाना प्रकरणे 68 प्राप्त झाले त्यापैकी 64 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून 4 प्रकरणे 60 दिवसाचे आतील प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकरणांचा दप्तर दिरंगाई कायद्यामध्ये नमूद वेळेच्याआत निपटारा होत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

COMMENTS