चित्रपटविश्वात बाप-लेकाची जोडी एकत्र दिसणे ही आता परंपराच आहे. अशीच एक अफलातून बापलेकाची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. जॉनी लिव्हर त्याच
चित्रपटविश्वात बाप-लेकाची जोडी एकत्र दिसणे ही आता परंपराच आहे. अशीच एक अफलातून बापलेकाची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. जॉनी लिव्हर त्याच्या कॉमेडीमुळे नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतात. त्यांचा मुलगा जेसी लिव्हरही आता मोठया पडद्यावर दिसणार आहे. जॉनी लिव्हर आपल्या कॉमेडीच्या अचूक वेळेमुळे प्रेक्षकांची मन जिंकत असतात. आता मुलगाही सिनेविश्वात वडिलांच्या पाउलावर पाउल ठेवून पदार्पण करणार आहे. ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र दिसणार आहे.दिग्दर्शक पारितोष पेंटर यांच्या ‘अफलातून’ चित्रपटात बापलेक एकत्र झळकणार आहेत. ‘अफलातून : अ डिफेक्टीविह कॉमडी’ असं म्हणत अफलातून चित्रपट २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अफलातून’ चित्रपटातून जॉनी लिव्हर आणि मुलगा जेसी लिव्हर एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटात हे दोघेही बाप-लेकाच्याच भूमिकेत दिसणार आहेत. जॉनी लिव्हर नवाब साहबच्या भूमिकेत तर जेसी लिव्हर नवाबचा मुलगा आफताबच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही बाप लेकाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे.’अफलातून’ चित्रटाचा टीजर आजच प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थ जाधवने टीजर सोशल मीडियावरून शेअर केला आहे. टीजरला ‘कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला’ असं कॅप्शन दिलं आहे. टीझरवरून हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार हे मात्र नक्की आहे. ‘अफलातून’ चित्रपटात जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हरसोबत सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्वीनी लोणारी, विजय भाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टीपणीस अशी कास्ट दिसणार आहे.
COMMENTS