Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात राजकीय उलटफेर होणार !

धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या फोडाफोडीच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत, महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पाडून मुख्यम

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे
रस्त्यांच्या कामाची नियमबाह्य देयके दिली कशी? धनंजय मुंडे कुणाला वाचवताय…? (Video)
 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या फोडाफोडीच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत, महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील महत्त्वाचे मोहरे टिपले आहेत,
अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यामध्ये दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे, तर बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील आमदार व माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही अजित पवार यांना साथ देत भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यात अनेक बुलेटवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, धनंजय मुंडे यांना विरोध करणारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीय बदललेले समीकरणे डोकेदुखी ठरू शकतात तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ दिल्यास जयदत्त क्षीरसागर यांना पुन्हा राष्ट्रवादीचे दरवाजे उघडे होऊ शकतात, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा बीड विधानसभेवरील दावाही मजबूत होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली आहे यापूर्वी झालेला बंड शरद पवार यांनी तात्काळ समविला होता यंदा मात्र परिस्थिती तशी नसल्याचे दिसून येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 36 आमदार यांनी अजित पवार यांना स्पष्ट पाठिंबा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, महाविकास आघाडीमध्ये यामुळे उभी फूट पडली असून, उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडलेला प्रकार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत घडला आहे का? बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते या सत्ता संघर्षाच्या लढाईमध्ये धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची साथ दिली व सत्तेत सहभागी झाले आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असणार्‍या पंकजा मुंडे यांच्यासोबत आत्ता ते जमून घेतील का? बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघावर याचे दुरगामी परिणाम दिसून येतील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात्र या सर्व घडामोडीमुळे संधी निर्माण झाली आहे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांना साथ दिल्यास बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेथे तसे सागर पुन्हा सक्रिय होऊ शकतात, तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस नक्कीच उभे राहतील! महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे निश्चितच बदलू शकतात, येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजित पवार हे दावा ठोकतील शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गट निर्माण होऊ शकतो.

COMMENTS