Homeताज्या बातम्यामनोरंजन

मिठाच्या कणापेक्षाही छोटी बॅग

विविध सामान तयार करणाऱ्या कंपन्या आपल्या आकर्षक डिझाईन्सने ग्राहकांचे मन जिंकत असतात. लुई व्हिटॉन कंपनीचे नाव देखील अशा यादीमध्ये समाविष्ट होते.

पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक
भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
Xiaomi ने आपले Redmi Watch 3 लॉन्च केले

विविध सामान तयार करणाऱ्या कंपन्या आपल्या आकर्षक डिझाईन्सने ग्राहकांचे मन जिंकत असतात. लुई व्हिटॉन कंपनीचे नाव देखील अशा यादीमध्ये समाविष्ट होते. सेलेब्सला या कंपनीच्या बॅगचे डिझाइन्स इतक्या आवडतात की, या ब्रँडच्या बॅग शिवाय त्यांचा लूक सुद्धा पूर्ण होत नाही असे मानतात. पण या ब्रँडच्या एका बॅगेचे किंमत लाखोंमध्ये असते. प्रत्येक प्रॉडक्टवर लोगो असतो, जो या बॅगला इतरांपेक्षा खूप वेगळी बनवतो. ही कंपनी सुंदर हँडबॅग्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच आता डिझायनर्सने असे काही केले आहे की ज्याबाबत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या हँडबॅगचे छायाचित्र MACHF (@mschf) नावाच्या अकाऊंटद्वारे पोस्ट केले गेले. एकून ३ फोटो आले आहेत. बॅगची रचना मायक्रोस्कोपिक दृश्‍यातून दाखविल्याचे पहिल्या फोटोमध्ये दिसते. यामध्ये हिरव्या रंगाची बॅग दिसत आहे, ज्यावर लुई व्हिटॉनचा लोगो आहे. दुसऱ्या फोटोत बोटावर पिशवी ठेवल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, तिसऱ्या फोटोमध्ये त्याचा मोठा आकार दिसत आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही बॅग MSCHF ने डिझाईन केली आहे, जी व्हायरल मार्केटिंग आर्टमध्ये तरबेज आहे. विशेष बाब म्हणजे पॅरिस फॅशन वीकमध्ये या बॅगला लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. ते मिठाच्या दाण्यापेक्षा लहान असते. तसेच ते सुईच्या बिळातून आरपार जाऊ शकते. एवढेच नाही तर बॅग पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज आहे. या बॅगेच किंमच ५२ लाख असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS