Homeताज्या बातम्यादेश

जगन्नाथ रथयात्रेत 7 जणांचा मृत्यू

रथाला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने घडली दुर्घटना

उनाकोटी/वृत्तसंस्था ः त्रिपुरामधील उनाकोटी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान रथाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने वीजप्रवाह रथात उतरला. या दुर्देवी घटन

राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार;उद्योगमंत्री सुभाष देसाई
बनावट शेअरमध्ये अडकलेले पैसे नागरिकांना परत मिळवून द्या
कोळगावमध्ये भर दिवसा घरफोडी

उनाकोटी/वृत्तसंस्था ः त्रिपुरामधील उनाकोटी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान रथाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने वीजप्रवाह रथात उतरला. या दुर्देवी घटनेत सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उनाकोटी येथील चौमुहनी परिसरातून रथयात्रा जात असताना रथाचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रथयात्रेत लोकांची मोठी गर्दी होती. रथयात्रा मिरवणुकीदरम्यान ही दुर्घटना घडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. उनाकोटी येथील चौमुहनी परिसरात रथयात्रा काढली होती. मिरवणूक सुरू असतानाच या रथावर एक विद्युत वाहक तार पडली. यावेळी रथावर किमान 20 लोक बसले होते. विजेचा धक्का बसून यातील सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.विद्युत वाहिनी तार रथावर पडल्याने रथालाही आग लागली आणि यामध्येही काही लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना सुरुवातीला कुमारघाट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तेथून सर्वांना उनाकोटी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे

COMMENTS