Homeताज्या बातम्याविदेश

कोरोना विषाणू हे चीनचे ’जैविक शस्त्र’

वुहानच्या संशोधकाचा धक्कादायक दावा

बीजिंग/वृत्तसंस्था : जगभरात 2020 आणि 2021 मध्ये कोरोना विषाणूचा धुमाकूळ घातला होता, लाखो रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तर लाखो रुग्णांचा मृ

साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे
विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
रक्ताच्या थारोळ्यात गरोदर महिला पडून जागीच खल्लास…| LOK News 24

बीजिंग/वृत्तसंस्था : जगभरात 2020 आणि 2021 मध्ये कोरोना विषाणूचा धुमाकूळ घातला होता, लाखो रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तर लाखो रुग्णांचा मृत्यू डोळ्यादेखत अनेकांना बघावा लागला, मात्र आता या विषाणूचे वास्त पुढे येत असून, कोरोना ही चीनची उत्पत्ति आहे असा आरोप होत होता. अमेरिकेने हा चीनी विषाणू असल्याचा दावा करत चीनच्या वूहानच्या प्रयोग शाळेच्या तपासणीची मागणी केली होती. मात्र, चीनने हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, चीनच्याच एका शास्त्रज्ञाने हा विषाणू चीनने तयार केला असून हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचा दावा देखील या शास्त्रज्ञाने केला आहे.
 वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे संशोधक चाओ शान असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. कोरोनामुळे जगात मृत्यूचे थैमान घातले होते. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या डबघाईला आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन मुळे सर्व बंद झाले होते. अनेक नागरिक हे आपल्या घरापासून दूर अडकून पडले होते. दरम्यान, हा विषाणू चीन मधून सर्व जगात पसरल्याने चीनने जाणीवपूर्वक अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या करण्यासाठी या विषणूचा वापर केला असा दावा चीनच्याच शास्त्रज्ञाने केला आहे. हा संशोधक वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील काम करतो. त्याने केलेल्या दाव्यानुसार लोकांना जाणीवपूर्वक संक्रमित करण्यासाठी कोविड 19 नामक विषाणूचे चीनने ’बायोवेपण केले. हा विषाणू चीनने ’जैविक अस्त्र’ म्हणून तयार केला होता आणि त्याच्या सहकार्‍यांना विषाणूचे चार प्रकार देण्यात आले. यामधील घातक असलेला कोरोना विषाणू अधिक वेगाने पसरू असा दावा देखील या शास्त्रज्ञाने केला आहे. जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणूचा प्रभाव आता कुठे कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या विषाणूचे मुळ नेमके कुठले आहे याचा शोध जगभरातील यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, हा विषाणू चीनने पासरवल्याचा आरोप हा अनेक देश करत होते. त्यात चीनच्या शास्त्रज्ञाने हा दावा केल्याने आता चीनची पोल खोल झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना चे मूळ शोधण्यासाठी एक टीम चीनला पाठवली. मात्र, चीनने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

COMMENTS