Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रकच्या केबिनमध्ये येणार एसी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

नागपूर : ट्रक किंवा कंटनेर चालवणे अनेकांना नकोसे वाटते, कारण त्यामध्ये एसीची सुविधा नसल्यामुळे. मात्र 2025 पासून रस्त्यावर चालणार्‍या सर्व ट्रक आ

गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा
रस्ते सुरक्षामध्ये लोकसहभाग सुनिश्‍चित करावा
कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढे यावे ः गडकरी

नागपूर : ट्रक किंवा कंटनेर चालवणे अनेकांना नकोसे वाटते, कारण त्यामध्ये एसीची सुविधा नसल्यामुळे. मात्र 2025 पासून रस्त्यावर चालणार्‍या सर्व ट्रक आणि कंटेनरच्या केबिनमध्ये एसी बसवणे अनिवार्य आहे. या वाहनांची केबिन पूर्णपणे एसी असावी, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरींच्या या घोषणेमुळे ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  
गेल्या काही दिवसांपासून भारतातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच ट्रक चालकांची कामाची खडतर परिस्थिती आणि रस्त्यावर जास्त वेळ वाहन चालवण्याचा थकवा हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. अशातच नितीन गडकरी म्हणाले, आपल्या देशातील काही ड्रायव्हर 12 किंवा 14 तास ट्रक चालवत असतात. तर इतर देशांमध्ये बस आणि ट्रक ड्रायव्हरला वाहन चालवण्यासाठी काही तासांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आपल्या देशातील ट्रकचालक 43 ते 47 अंश तापमानात गाडी चालवतात. आपण या ट्रक चालकांच्या स्थितीची कल्पना केली पाहिजे. मी मंत्री झाल्यानंतर एसी केबिन सुरू करण्यास उत्सुक होतो. मात्र त्यामुळे खर्च वाढणार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध केला. आता मी फाईलवर सही केली आहे, की सर्व ट्रक केबिन एसी केबिन असतील, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. 

COMMENTS