Homeताज्या बातम्यादेश

सिग्नल अभियंता कुटुंबियांसह फरार

ओडिशा रेल्वे अपघाताच्या चौकशीला वेगळे वळण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 292 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. तर या धक्क्यातून अजूनही अनेक प्

बंधार्‍यावरून लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद
शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 292 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. तर या धक्क्यातून अजूनही अनेक प्रवाशी सावरू शकलेले नाही. या प्रवाशांना प्रचंड धक्का बसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआय या अपघाताची चौकशी करत असून, अपघातावेळी ड्यूटीवर असलेला सिग्नल इंजिनीयर कुटुंबियांसह बेपत्ता असल्याचे तपासातून समोर आले आहे.
 रेल्वे प्रशासनाने या अपघातासाठी सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर आता सीबीआयने सिग्नल यंत्रणा विभागातील सिग्नल जुनियर इंजीनियरचे घर सील केले आहे. परंतु तो कुटुंबियांसहित गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बालासोरमध्ये रेल्वेत नोकरी करणारा सिग्नल इंजिनीयर भाड्याच्या खोलीत राहत होता. रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून तो कुटुंबियासहित बालासोरमधून फरार झाला आहे. यापूर्वी सीबीआयच्या प्राथमिक तपासात त्याची चौकशी करण्यात आली होती. परंतु दुसर्‍यांदा सीबीआयचे पथक त्याच्या घरी पोहचल्यानंतर तो फरार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी घर सील करत सिग्नल अभियंत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहेदरम्यान ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 292 वर पोहचली आहे.

सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप – रेल्वे अपघात झाल्यानंतर सहा जून रोजी अज्ञात आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप रेल्वेकडून करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली. सीबीआयने बालासोरमधील इंटरलॉकिंग पॅनल सील केला असून ट्रेन बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर कोणत्याही रेल्वे न थांबवण्याच्या सूचना केल्या आहे.

COMMENTS