मुलांच्या लठ्ठपणाची समस्या पालकांच्या मानसिकतेशीही निगडीत – डॉ. राजेंद्र खताळ

Homeमहाराष्ट्र

मुलांच्या लठ्ठपणाची समस्या पालकांच्या मानसिकतेशीही निगडीत – डॉ. राजेंद्र खताळ

आपल्या देशात एकीकडे कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे, तर दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर लिहिलेले पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खताळ यांनी केले.

प्रदीर्घ चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक
शिवरायांनी वापरलेली वाघनखं भारतात आणणार ः मुनगंटीवार
भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित

संगमनेर/प्रतिनिधी : आपल्या देशात एकीकडे कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे, तर दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर लिहिलेले पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खताळ यांनी केले. लोणी येथील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या समस्येवर लिहिलेल्या ‘न्युट्रीसायको कौन्सिलिंग टू कॉम्बॅट चाईल्डहूड ओबेसिटी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. यावेळी संगमनेर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व डॉ. अरविंद रसाळ, सिन्नर येथील प्राचार्य पी. व्ही. रसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. रसाळ यांनी आपल्या भाषणात पालकांच्या बदलत्या मानसिकतेचा आढावा घेऊन ही समस्या बदलत्या जीवनशैलीचा परिपाक असल्याचे म्हटले. प्राचार्य. पी. व्ही. रसाळ यांनी आपल्या भाषणात म्हटले की, बऱ्याच ठिकाणी आईवडील दोघेही नोकरी करणारे असल्याने ते मुलांना वेळ देऊ शकत नाहीत आणि यातून मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देण्याचे प्रमाण वाढते. डॉ. अनुश्री खैरे या मानसशास्त्र व आहारशास्त्राच्या अभ्यासक आहेत, याच विषयावर त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे. लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या त्याच्या आहाराबरोबरच पालकांच्या मानसिकतेशीही निगडीत असते हा विषय घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक स्नेहीजणांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले तर प्रा. लक्ष्मण घायवट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र खैरे, उज्ज्वल दुबे यांनी विशेष प्रयत्न केले

COMMENTS