Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहेब चषक संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत झाला फुटबॉलचा अंतिम सामना

गेवराई प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक नाईन साईड डे नाईट राज्यस्तरीय निम

अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत गोंधळ
Nanded : अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन (Video)
भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनले इंग्लंडचे पंतप्रधान

गेवराई प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक नाईन साईड डे नाईट राज्यस्तरीय निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना छत्रपती संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला. शारदा काडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत झालेल्या हा अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.
गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर 10 ते 13 जून दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक नाईन साईड डे नाईट राज्य स्तरीय निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 13 जूनला अंतिम सामना यंग बॉईज औरंगाबाद विरुध्द बीड फुटबॉल अकादमी यांच्यात झाला. अंतिम सामना अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत खेळला गेला. यावेळी अतिशय चुरशीच्या व रोमांचकारी झालेल्या लढतीत अंतिम सामना सामना छत्रपती संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला. शारदा काडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्रातील 16 संघ सहभागी झाले होते. काही संघांमध्ये विदेशी खेळाडूंचा सहभाग होता. यावेळी बोलताना रणवीर पंडित यांनी गेवराई शहरवासियांचे आभार   मानले व स्पर्धेचा सिजन टू याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक एल .आर. डी. फुटबॉल क्लब व शारदा फुटबॉल अकॅडमीचे फुटबॉलचे कोच राष्ट्रीय खेळाडू नवीद मशायक, युवा नेते शेख मोहसीन, शिनुभाऊ बेद्रे, सचिन वाघमारे, शाहिद हुसैनी, प्रा .जावेद जमादार, शेख इमरान, नकुल मोटे, योगेश गाडे, उबेद काजी, मोमीन हसीब, संभाजी धायगुडे, माऊली बेद्रे, अजय राठोड, अभिषेक लाड, विलास कापसे, सय्यद हुसेब, सय्यद अरीब, कासेब, स्वप्निल राठोड, आदित्य सोळंके, सय्यद अरहाम आदी फूटबॉल खेळाडू स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, बंडू मोटे, दीपक आतकरे, शेख खाजा मामू, संजय पुरणपोळे, दिनेश कानडे, दिनेश घोडके, दत्ता दाभाडे, सोमनाथ गिरगे, अमजद भाई, ड. स्वप्निल येवले, फैसल चाऊस, अविनाश मोटे, अजीम भाई, अनिस भाई, बाळासाहेब दाभाडे, वसीम आतार, अलीम यांच्यासह अनेकांनी स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी गेवराई शहरातील फुटबॉल प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS