Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेगाच्या कामाची इंजिनियर आणि ऑपरेटरनी वाट लावली

शेततळे नखोदता, मोहगणी नलावता, पांदण रस्ते बोगस कोणतेच कागदपत्रे नपाहता नरेगाचे मस्टर निघते कसे?

गेवराई - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे चे काम नकरता, मोहगणी लागवड केली नसताना, आणि बोगस पांदण रस्ते केलेल्या कामात पंचायत

प्रवासी-कंडक्टर महिलांमध्ये हाणामारी
ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅप…लिपिकाला पैसे घेताना पकडले

गेवराई – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे चे काम नकरता, मोहगणी लागवड केली नसताना, आणि बोगस पांदण रस्ते केलेल्या कामात पंचायत समितीच्या इंजिनियर दिलीप पवार आणि ऑपरेटर येवले यांनी चांगलेच डोके लावत लाखोंचा गैरव्यवहार साधून मलिदा लाटण्याचा प्रताप तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामात केला आहे, अनेक बोगस कामे त्याच्या मार्फत झाली असून बोगस मजूर दाखवत त्यांच्या नावावर लाखो रुपये मस्टरद्वारे उचलून ऑपरेटर येवले यांचे पाहुणे असलेले नातेवाईक यांच्या घस्यांत घालण्याचे काम या नरेगाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करून झाले असून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबाच्या लाभार्थी सदस्या कडून पैसे खाण्याचे पाप त्याच्याकडून झाले असल्याने त्याची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती यावर बीड या ठिकाणी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाली परंतु यामध्ये नेमके काय झाले हे संबधित शेतकरी यांना नकळवता या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी पैसे देवून मॅनेजमेंट केले असल्याची चर्चा आहे,याकडे जिल्हाधिकारी बीड यांनी लक्ष देवून गेवराई पंचायत समिती मधील इंजिनियर विजय पवार आणि ऑपरेटर येवले यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
गेवराई पंचायत समिती मार्फत नरेगाची अनेक कामे राबण्यात आली असून मागील काही महिन्यात रोहयो चे अनेक कामे चर्चेत आलेले असताना तलवाडा येथील नरेगच्या अनेक कामात गैरकारभार करून पंचायत समिती मध्ये मास्टरवर बोगस मजूर दाखवून त्याच्या मागणी करून पैसे देण्यापर्यंत चिरीमिरी ठेवून ती खाऊन शेततळ्याचे खोदकामे नकरता ही काम झालेले दाखवून पैसे हडपण्याचा प्रताप केला आहे तर पांदन रस्ता वर बोगस मजूर दाखवून त्यांच्या मार्फत पैसे उचलून देण्याचे काम या इंजिनियर आणि ऑपरेटर यांनी केले आहे त्याच बरोबर अनेक ठिकाणी मोहगणी न लावता या कामाच्या मागण्या घेऊन रोहयोच्या कामात मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला.असल्याची चर्चा तलवाडा गावात मोठ्या चवीने होत आहे, अनेक पात्र लाभार्थी अजूनही विविध योजनेपासून वंचित असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लाभार्थी लाभापासून सदस्य ही लाभ वर्षांपासून वंचित आहेत, गेवराई तालुक्याचे लाभाच्या विहिरी मंजूर करून मागील चार वर्षांपूर्वी पंचायत समिती कार्यालयात पत्र देण्यात आले होते परंतु त्यातील अनेक लाभार्थी अद्याप ही लाभापासून दूर आहेत , फक्त आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या हस्ते आदेश वितरीत करण्यात आले परंतु त्यांना अजूनही त्या कुटूंबांना लाभ मिळावा नाही परंतु ज्यांनी काहीच काम केले नाही अशा शेतकरी यांना शेततळे, पांदण रस्ते, मोहणी लागवड नकरता लाभ मिळत असून जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना आजही लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे अनेकांनी या कामाची प्रत्यक्षात पाहणी करावी तसेच पैसेखाऊ इंजिनियर आणि ऑपरेटर यांची सखोल चौकशी करावी त्यांनी केलेल्या सर्व कामाची पाहणी एका समिती द्वारे करून काम झालेत की नाही हे पहावे यामध्ये जर संबधित दोषी अढळून आले तर त्यांना निलंबन करून त्यांच्या कडून पैसे वसूल करावे जेणे करून यांच्या पश्चात अधिकारी आणि कर्मचारी चागले काम करतील.
 नेरेगाचा इंजिनियर विजय पवार यांची सखोल चौकशी करावी
गेवराई पंचायत समिती मधील नेरगाचा इंजिनियर विजय पवार हा आर्थिक प्राप्ती साठी काहीही करत वरिष्ठ अधिकारी यांचे नाव वापरून तसेच संबधित लाभार्थी यांना सांगून दवाब आणण्याचा प्रयत्न करत आसुंन ,माझे कोणीच काही करत नाही अशा तोर्‍यात वावरतो,परंतु तो ज्या गटाचा कार्यभार सांभाळतो तेथील एक जन हाताखाली धरून चिरीमिरी खाण्यात पटाईत आहे,पण जेव्हा एखादे प्रकरण अंगलट येणाचे समजले तर स्वताला वाचवण्या साठी पाहुणे,मित्र,तक्रार दार यांच्या संबधित कोण आहे याची माहिती घेवून त्यांना सांगून प्रकरण दाबण्याचा घाट घालतो
तर पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ.
शेतकरी हे सततच्या नापिकला कंटाळून आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर होत असल्यामुळे आत्महत्या करत आहेत या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला शासनाकडून विविध योजना देवून धीर देण्याचे काम करण्यात येते परंतु विविध ऑफिस मधील लालची अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचे काम करत असतात,असाच प्रकार गेवराई पंचायत समिती मधील नरेगाच्या कामात झाला असून अजूनही होत आहे.यामुळे शेतकरी आणि लाभार्थी हवालदिल झाले असून काम वेळेवर न झाल्यामुळे आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे.

COMMENTS