Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल

उदगीर प्रतिनिधी - उदगीरात झालेल्या पावसाने उदगीरच्या बसस्थानाकाची दैन्यवस्था उडाली असून बसस्थानाकात या पावसाने चिखल पाणी झाल्यामुळे बसेसना मुख्य

बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू ; संगमनेर बसस्थानकावरील घटना
भाऊजीने केला मेहुण्याचा खून
वाडा हॉटेलपासून पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंत वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती

उदगीर प्रतिनिधी – उदगीरात झालेल्या पावसाने उदगीरच्या बसस्थानाकाची दैन्यवस्था उडाली असून बसस्थानाकात या पावसाने चिखल पाणी झाल्यामुळे बसेसना मुख्य रस्त्यावर थांबावे लागत आहे. उदगीर तालुक्यात पहिल्या पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या कडकडाटाच्या आवाजात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल एक तास झाला. या पावसाने उष्णतेची लाट कमी झाली असली तरी उकाडा मात्र मोठ्या प्रमाणात जाणवत होता. उदगीर बसस्थानाकाचे काम सुरू असल्यामुळे पावसाचे पाणी साठून चिखल झाल्यामुळे बसेसना उदगीरच्या मुख्य रस्त्यावर थांबावे लागत आहे. प्रवाशांना चिखल तुडवीत बसस्थानाकात जावे लागत आहे.
बसस्थानाकाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था चांगली देणे बंधनकारक असताना ठेकेदार, परिवहन विभागाचे अधिकारी व अभियंत्याकडून एक लहान पत्र्याचे शेड सोडले तर रस्ते व विजेची सोय अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. चिखलामुळे बाहेर गावी जाणा-या बसेस कोठेही लावल्या जात आहेत. बसस्थानाकासमोर रस्त्यावर या बसेस थांबल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. उदगीर बसस्थानाकात शेजारच्या कर्नाटक व तेलंगणा राज्यातील बसेस मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. शिवाय लातूर जिल्ह्यातील दोन नंबरचे हे आगार असताना परिवहन महामंडळाच्या अधिकारी, अभियंत्यांचे या आगाराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानाकात झालेल्या चिखलामुळे प्रवाशांना चालत जाऊन बस पकडणे कठीण झाले आहे. चालत्या बसच्या टायरमधून चिखल उडून प्रवाशांचे कपडे घाण होत असल्यामुळे हाणामारी व हमरीतुमरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

COMMENTS