Homeताज्या बातम्यादेश

ओडिशात मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था ः ओडिशा राज्यात नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातामुळे 288 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच, सोमवारी पुन्हा एकदा

राज्यात आरक्षण प्रश्‍नांवर स्फोटक परिस्थिती
निवडणूक आणि सोशल मीडिया
सत्ता स्थापनेसाठी जोर-बैठका

भुवनेश्‍वर/वृत्तसंस्था ः ओडिशा राज्यात नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातामुळे 288 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच, सोमवारी पुन्हा एकदा मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. बारगढ जिल्ह्यात मेंधापाली इथं हा अपघात झाला असून एका भरधाव मालगाडीचे तब्बल पाच डब्बे हे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघात जीवित आणि वित्त हानी झाली नाही.
ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा एक रेल्वे अपघात झाल्याची घटना घडलीय. बारगढ जिल्ह्यात मेंधापाली इथं मालगाडीला अपघात झाला असून यात पाच डबे रुळावरून घसरले आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो एका खासगी सिंमेंट कंपनीचा ट्रेन ट्रॅक आहे. कंपनीचा रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅकही आहे. रेल्वेचा याच्याशी काहीच संबंध नाही, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले आहे. इस्ट कोस्ट रेल्वेने या घटनेची माहिती देताना म्हटलं की, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातल्या मेंधापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीकडून चालवण्यात येणार्‍या मालगाडीचे काही डब्बे फॅक्ट्री परिसरात असलेल्या रुळावरून घसरले. यामध्ये रेल्वेचा काहीही संबंध नाही. दरम्यान, ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा स्थानकावर झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या 51 तासांनंतर काल रात्री डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रात्री 10.40 च्या सुमारास एक मालगाडी डाऊन मार्गावरून संथ गतीने मार्गस्थ झाली. मालगाडीत कोळसा भरून तो हल्दियाला पाठवण्यात आला. यावेळी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी स्थानकाजवळ उभे होते.

COMMENTS