Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच

आमदाराचे घर जाळत, 100 घरांना लावली आग

इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून मणिपूर राज्य सातत्याने धुमसत असून, हा हिंसाचार गेल्या काही दिवसांपासून थांबण्याची चिन्हे नाहीत. मणिप

पोलिस तपास थंडावला…‘विद्युत’च्या अहवालाची प्रतीक्षा
आसाममध्ये बालविवाह विरोधात मोठी कारवाई
चोरीच्या शेळ्यासह आरोपी पकडला

इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून मणिपूर राज्य सातत्याने धुमसत असून, हा हिंसाचार गेल्या काही दिवसांपासून थांबण्याची चिन्हे नाहीत. मणिपूरमध्ये रविवारी पुन्हा हिंसाचार उसळला असून, काकचिंग जिल्ह्यातील सेरो गावात काही लोकांनी 100 घरांना आग लावली. यामध्ये काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घराचाही समावेश आहे. राज्यात मेईतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये 3 मेपासून संघर्ष सुरू आहे. राज्यात आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 310 जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, 37 हजारांहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले. हिंसाचारामुळे 11 हून अधिक जिल्हे प्रभावित झाले आहेत.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी काही लोक सेरो गावात आले आणि त्यांनी आमदार रणजीत यांच्या घराची तोडफोड सुरू केली. आमदार व त्यांच्या कुटुंबीयांची सुटका झाली. हिंसक जमावाने अनेक घरांना आग लावली. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, आग लागल्यानंतर लोकांना घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना मदत छावणीत नेण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात तैनात असलेल्या बीएसएफच्या पथकावरही जमावाने गोळीबार केला. पोस्टवर मोर्टारने हल्ला करण्यात आला. आतापर्यंत एकही जवान जखमी झालेला नाही. संशयितांनी बीएसएफ चौकीवर हल्ला करण्यासाठी चोरीच्या शस्त्रांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सुरक्षा दल आणि हिंसक जमाव यांच्यात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार उसळला, महिना उलटूनही राज्यात हिंसाचार थांबत नसताना, गृहमंत्री अमित शहा 29 मे रोजी चार दिवसांच्या दौर्‍यावर मणिपूरला पोहोचले. दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी (1 जून), शहा यांनी मणिपूरमधील लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे सांगितले. शस्त्र बाळगणार्‍यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

COMMENTS