Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी

अपघातामध्ये 26 प्रवाशी जखमी

धाराशीव/प्रतिनिधी ः देशभरात ओडिशातील रेल्वे अपघाताची चर्चा सुरू असतांना, शनिवारी सकाळी धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाल्याचे समोर

जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे – कवी माने
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतले भगवान परशुरामाचे दर्शन
मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी

धाराशीव/प्रतिनिधी ः देशभरात ओडिशातील रेल्वे अपघाताची चर्चा सुरू असतांना, शनिवारी सकाळी धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाल्याचे समोर आले आहे. त्यात 26 प्रवासी जखमी झालेत. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले आहे. तर इतर सर्वांवर परांडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातल्या सोनगिरी चाकूला येथे ही दुर्घटना झाली. परांडा डेपोची बस धाराशिवला येत होती. मात्र, चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधले 26 प्रवासी जखमी झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती पाहता त्यांना बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात प्रचंड भीषण होता. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. पंचक्रोशीत हा-हा म्हणत बातमी पसरली. परिसरातल्या लोकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे जखमी प्रवाशांना दिलासा मिळाला. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. ओडिशातल्या बालासोर येथे तीन रेल्वे एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातांमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. तितकेच लोक जखमी झालेत. हा अपघात थरकाप उडवणारा आहे. तशातच धाराशिवकरांच्या कानी परांडातल्या अपघाताची बातमी आली. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परिसरात फक्त अपघाताच्याच बातम्यांची चर्चा होती.

COMMENTS