Homeताज्या बातम्यादेश

रेल्वे अपघातात मृत्यूचे तांडव

कोरोमंडल एक्सप्रेस अपघातात 261 प्रवाशांचा मृत्यू ; 900 हून अधिक प्रवासी जखमी

बालासोर/वृत्तसंस्था ः रात्रीची वेळ, प्रवासी अर्धझोपेत असतांना, झालेला अपघात, त्यानंतर सुरू झालेले रडझे, हुंदके, किंकाळ्या, जखमी लोक रात्रभर त्या

दार्जिलिंग रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू
पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 15 ठार, 50 जखमी
बिहारमध्ये रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू

बालासोर/वृत्तसंस्था ः रात्रीची वेळ, प्रवासी अर्धझोपेत असतांना, झालेला अपघात, त्यानंतर सुरू झालेले रडझे, हुंदके, किंकाळ्या, जखमी लोक रात्रभर त्या परिसरात मदतीची वाट पाहत असतांना सुरू झालेले मृत्यूचे तांडव यामध्ये तब्बल 261 प्रवाशांनी आपला जीव गमावला, तर 900 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. एनडीआरएफने बोगींच्यामध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला, यावरून या अपघाताची भयावहता दिसून येते. ओडिशा राज्यातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली. एका रेल्वे अधिकार्‍याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसर्‍या रुळावरून उलटले आणि दुसर्‍या बाजूने येणार्‍या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसर्‍या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या. या भीषण अपघातात तब्बल 261 प्रवाशांचा मृत्यू झाला.
कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक 12841 चे कोच बी 2 ते बी 9 हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी 1 हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरले. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे. कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. जखमींना रक्ताची गरज आहे त्यामुळे जखमींना रक्तदान करण्यासाठीही आवाहन केले जाते आहे. त्यानंतर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि भद्रक या ठिकाणी अनेक रक्तदातेही जखमींना रक्त द्यायला आले होते. ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना 12 लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

हेल्पलाइन नंबर
आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 6782262286
हावडा: 033-26382217
खरगपूर: 8972073925, 9332392339
बालासोर: 8249591559, 7978418322
कोलकाता शालीमार: 9903370746

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश – या घटनेचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी असलेल्या रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, आता आमचे लक्ष बचाव आणि मदत कार्यावर आहे. या रेल्वे अपघाताचे कारण तपासानंतर कळेल, असेही ते म्हणाले. रेल्वे अपघाताची चौकशी दक्षिण पूर्व सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए एम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केली जाईल, असे भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. 12864 बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे हावडा मार्गावर रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळांवर पडले, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली. हे रुळावरून घसरलेले डबे 12841 शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि तिचे डबेही उलटले, असेही सांगण्यात आले आहे.

COMMENTS