किनगाव वार्ताहर - अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी व सांडपाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. किनगाव येथील नवीन बस स

किनगाव वार्ताहर – अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी व सांडपाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. किनगाव येथील नवीन बस स्थानकाचे 1992 साली उद्घाटन झाले. यावेळी या बसस्थानकात पिण्याचे पाणी, सांडपाणी कमी पडू नये म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली व शौचालय बांधले बसस्थानकात लागणा-या सर्व सुविधा करण्यात आल्या. याच वेळी या बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी बोअर घेण्यात आला. या बोअरला पिण्यापुरते व सांडपाणी करण्यापुरते पाणी लागले यावेळी दोन-तीन वर्ष या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली नाही मात्र अचानक तीन वर्षानंतर बोरमधील मोटर जळाली ती आज वीस-बावीस वर्षापासून दुरुस्त न केल्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाही.
पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा उपयोग न केल्यामुळे तीही खराब झाली आहे. बोरची दुरुस्ती केली तर किनगाव बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणार नाही मात्र संबंधित अधिकारी या पिण्याच्या पाण्याच्या बोअरकडे लक्ष देत नाहीत यामुळे या बस स्थानकात पिण्याचे पाणी मिळत नाही. प्रवाशांना पाणी आणण्यासाठी पिण्यासाठी आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिणे जावे लागते. तसेच बसस्थानकात पाणी उपलब्ध नसल्यामुळे बसस्थानकातील शौचाल खराब झाले आहे. याचा महिलांना खूप त्रास होत आहे. या बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याचा व शौचालयाचा वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
COMMENTS