Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अतिक्रमणात असल्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख

मग सार्वजनिक बांधकाम विभागातघोड कुठे पेंड खात

किनवट प्रतिनिधी - किनवट शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीच्या कामात अडथळे निर्माण होण्यामागची कारण मिमांसा शोधण्यासाठी जिल्हाधिकार्यांन

चोरीस गेलेल्या पिकअपसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला
हिंगोलीत विद्युत अभियंत्यांवर फेकली चप्पल

किनवट प्रतिनिधी – किनवट शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीच्या कामात अडथळे निर्माण होण्यामागची कारण मिमांसा शोधण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशावरुन केलेल्या स्थळ पहाणीचा स्वयंस्पष्ट संयुक्त अहवाल जशाचा तसा 11 मे रोजी त्यांच्या दालनात सहायक जिल्हाधिकार्यांनी सादर केला. अशोक स्तंभापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत 30 मिटर रुंदीकरणाच्या वादावरुन स्थळ पहाणी झाली. मग उर्वरीत भागात 30 मिटरचे काम का केले जात नाही ? असा माजी आमदार प्रदीप नाईकांसह विकासप्रेमींचा संबंधित प्रशासनाला सवाल आहे. वादाच्या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन कर्तव्यकसूर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी विकासप्रेमी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसतात. मोठ्या प्रमाणात जन आंदोलनाचे नियोजन  करण्यात येत आहे.
किनवट शहरातील अशोकस्तंभ-जिजामाता चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दुतर्फा अतिक्रमन असल्यामुळे ते वगळता उर्वरीत सर्व ठिकाणी 30 मिटर रुंदीच्या मार्गासाठी जागा उपलब्ध असल्याचा समितीचा स्वयंस्पष्ट अहवाल आहे. शिवाय गोकुंदा रेल्वेगेटवर उड्डाणपुलासाठी जागा देखिल उपलब्ध  असताना हा प्रश्न  का रेंगाळत ठेऊन लोकांना वेठीस धरले ? असाही संतप्त सवाल आहे. विवाद विरहीत जागा उपलब्ध असतांना 30 मिटर रुंदीचे काम करण्यासाठी एजन्सी आणि महामार्ग यंत्रणा आडेवेडे का घेतंय ? त्यांनी चालवलेल्या अनियमितते विषयी विचारविमर्श करण्यासाठी विकासप्रेमींची लवकरच बैठक होणार असल्याचे समजते. गोकुंदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सा.क्र. 91/770 ते 92/600 मधिल 830 मिटर लांबी आणि किनवट शहरातील  92/600 ते 94/00 मधिल 1400 मिटर लांबीचा रस्ता हा पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडते. पर्यावरण, जल आणि वायू परिवर्तन मंत्रालयाच्या 30 नोव्हेंबर 2016 च्या अधिसूचनेचे अनुपालन करण्याचा मुद्दा किनवट वनविभागाने अहवालात उपस्थित केला आहे.राष्ट्रीय महामार्ग 161 अ ची 30 मिटर जागा उपलब्ध नसल्याचा शेरा संयुक्त अहवालात मांडला. कोठारी ते धनोडा या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीच्या कामासंबंधाने पैनगंगा अभयारण्य संवेदशिल क्षेत्र संनियंत्रण समितीने 20 जून 2022 रोजी बेठक घेऊन प्रस्तावित केलेल्या मागणीनुसार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग परिपत्रक क्र.एसएसआर.6957 सी,25 मार्च 1957 नुसार 18 मिटर वरुन 30 मिटर पर्यंत रुंदीकरणाचे काम करण्याच्या परवानगीसाठी जिल्हाधिकार्यांना कळवले त्यावरुनच 12 एप्रिल रोजी तहसिलदार तथा किनवट नगर परिषदेच्या प्रशासक डॉ.मृणाल जाधव, सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकर, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग किनवट, सहायक वनसंरक्षक (जंकासं) गणेश गिरी यांनी किनवट शहरातील वादग्रस्त केलेल्या रस्त्याच्या सद्यस्थितीची संयुक्त स्थळ पहाणी केली होती.गग अहवालाला मात्र विलंब झाला आणिग दरम्यान न्यायालयाने स्थगनादेशही दिल्याचे वृृत्त आहे. हिमायतनगर-किनवट-माहूर-धनोडा मार्गाला 3 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 161 अ म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर 27 नोव्हेंबर 2017 रोजी हा राज्यमार्ग सा.बां.विभाग भोकर कडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे हस्तांतरीत झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून 17.2 मिटर, पौर्णिमा होटलपासून 18.20 मिटर, गायत्री उडप्पी सेंटरपासून 16.50 मिटर, सुंदर हॉस्पिटल 19.7 मिटर, महाराणा प्रताप चौकापर्यंत 30 मिटरचा असल्याचे अहवालात दर्शवले आहे. मंत्री गडकरींच्या माहूर दौर्यात ज्यांनी कोठारी ते हिमायतनगरच्या रस्त्याचा मुद्दा मांडला .परंतू किनवटातील या भीजत घोंगड्याविषयी चक्कार शब्दही काढला नसल्याने लोकांमध्ये चर्चा तर होणारच.

COMMENTS