Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उद्या होणार उद्घाटन

रायगडावर 350 वा सोहळा दिमाखात होणार साजरा

रायगड/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आ

राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
फुकट्या प्रवाशांकडून 11 लाखाचा दंड वसूल
मान्सूनवर ’अल निनो’चे सावट

रायगड/प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यादरम्यान मंगळवार, 6 जून रोजी देखील सकाळी 8.30 वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे 1 ते 6 जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यभिषेकानिमित्त 1 जून ते 7 जून या काळात गेट वे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. 1 जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, 2 जून रोजी राजस्थानी लोककला, 3 व 4 जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच 5 ते 7 जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच 1 ते 7 जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असतील. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थित राहणार आहेत.

शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा – नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्‍वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलिस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणार्‍या 4 तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणार्‍या 16 अ‍ॅब्म्युलन्स  सज्ज ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण 24 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून 104 डॉक्टर्स व 350 आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.

एसटीच्या 150 बसेस तैनात – संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणार्‍या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्‍वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गाने येणार्‍या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गे येणार्‍या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

COMMENTS