Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात

पोलिसांनी तब्बल 5.36 कोटींचे ड्रग्ज जप्त

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात होणार्‍या रेव्ह पार्टया, आणि मुंबईहून अनेक जण पुण्यात पार्टी करण्यासाठी देण्यात येणारे प्राधान्य या बाबी बघता, पुणे शहर

शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर
बॉलिवूड अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी l LokNews24
देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात होणार्‍या रेव्ह पार्टया, आणि मुंबईहून अनेक जण पुण्यात पार्टी करण्यासाठी देण्यात येणारे प्राधान्य या बाबी बघता, पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडत चालले आहे. पुणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्तीची कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहे. मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम ड्रग्स आहे. उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे हे वापरले जाते. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ पथकास सातारा येथून मुंबईला मोठया प्रमाणात मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, कस्टम पथकाने सातारा येथून आरोपींच्या काळया रंगाच्या फोर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग केला. खेड शिवापूर टोलनाका येथे गाडी आली असताना, कस्टम पथकाने संबंधित गाडी पकडली. त्यावेळी गाडीत दोघेजण होते, त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला 850 ग्रॅम मेथामाफेटामीन मिळून आले. परंतु त्यांचे आणखी दोन साथीदार लोणावळयात त्यांना भेटणार असून त्यांच्याकडेही अंमली पदार्थ आहे. त्यानुसार कस्टम पथकाने लोणावळा पर्यंत सदर गाडी घेऊन जात, त्याठिकाणी आणखी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही 200 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी हे 25 ते 35 वयोगटातील असुन ते यापूर्वी कुरिअर कंपनीत कामास होते. त्याठिकाणचे संर्पकाचा वापर करुन त्यांनी अंमली पदार्थाची तस्करी सुरु केली होती का? याबाबत अधिक तपास केला जात आहे. नेमके सदर अंमली पदार्थ कोठून आणले होते, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, त्यांचे अन्य साथीदार कोण आहे, त्यांच्यात किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला याबाबतचा अधिक तपास कस्टम विभागाचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून 36 लाख रुपयांचे ’म्याव म्याव’ म्हणजेच मेफीड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी जितेंद्र दुवा या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात सातत्याने अमली पदार्थांचा साठा जप्त होत असल्यांने पोलिसांचीही चिंता वाढली आहे.

COMMENTS