कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित, राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित, राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरले

कोकण रेल्वे मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर पडल्याने हजरत निजामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून घसरले.

भाजप नगरसेवकाकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण | LOKNews24
कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?
निवडणूक आज जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर पडल्याने हजरत निजामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून घसरले. याचा परिणाम कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या अनेक स्थानकांवर थांबविल्या आहे. 

    राजधानी एक्सप्रेसचे इंजिन मार्गावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल, असेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे.

COMMENTS