Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गजबजलेल्या चौकात जळतोय कचरा

लातूर प्रतिनिधी - शहरातील घन कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचे कसलेही वचक राहिलेले नाही. करार केला आणि सोडून दिला, अशी परिस्थिती सध्या

माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?
परशुराम जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅली
सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी

लातूर प्रतिनिधी – शहरातील घन कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचे कसलेही वचक राहिलेले नाही. करार केला आणि सोडून दिला, अशी परिस्थिती सध्याची दिसून येत आहे. शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाण पुलाखाली वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जातो. दिवस-रात्र कच-याच्या धुराचे लोळ उठतात. या धुराचा चौकातील व्यापा-यांना आणि नागरीकांचा प्रचंड त्रास होत आहे. प्लास्टीक कॅरीगॅब, पॅकींगचे थर्माकोल आणि इतर अपायकारक कचरा चौकात येतो कोठून आणि तो जाळतो कोण? याचा थांग पत्ता लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा शोध घेण्याची तसदीही मनपा प्रशासन घेत नसल्यामुळे कचरा जाळणा-यांचे धारिष्ठ्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील कच-याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्याचे काम जनाधार सेवाभावी संस्थेला दिले आहे. शहरातून निघणा-या दररोजच्या दोनशे टन कच-याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता विभागासोबतच जनाधार या संस्थेचाही यात सहभाग घेण्यात आला आहे. मनपाच्या स्वच्छता विभागातील सुमारे 400 कर्मचारी शहरात स्वच्छतेचे काम करीत असतात. त्या जोडीला जनाधार संस्थेचेही कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करीत असतात. जनाधार या संस्थेचे 400 कर्मचारी शहरातील घरोघरी जाऊन ओला, सुका आणि घातक कच-याचे संकलन करतात. शहरातील रस्त्यांची झाडलोट करण्याची जबाबदारी 100 कर्मचा-यांवर आहे. नाले सफाईच्या कामावर 75 तर कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी 50 कर्मचारी कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात 84 घंटागाड्या, जनधार संस्थेचे 50 ट्रॅक्टर, 13 हायवा, 25 ते 30 इतर वाहने कार्यरत आहेत. शहरातल्या शहरातच घनकच-यावर प्रक्रिया करण्याचेही प्लॉन्ट उभारण्यात आलेले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 5, 10, 11, 13 आणि 14 मधील कच-यावर शहरातच प्रक्रिया केली जात आहे. या व्यतिरिक्त शहरातील कचरा शहरापासून जवळच असलेल्या वरवंटी कचरा डेपोवर नेला जातो व तेथे कच-यावर प्रक्रिया केली जात आहे. ओला, सुका कच-यावर काही प्रमाणात शहरातच प्रक्रिया केली जात आहे. ओल्या कच-यावर विल्ड्रो सिस्टीमने कलचर मारुन कचरा कुजवला जात आहे. मात्र, संपूर्ण घातक कचरा वरवंटी कचरा डेपोवरच पाठवला जात आहे. वरवंटी कचरा डेपोवर वॉरियर यंत्राद्वारे कच-याचे विलगीकरण केले जात आहे. हे सर्व मनपाच्या लेखी आहे. यापैकी खरेच काय काय होते, याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष नाही. शहरातील महानगरपालिकेचे व खाजगी व्यापारी संकुलांतील पहिल्या, दुस-या, तिस-या, चौथ्या किंवा त्यापेक्षा जास्त मजल्यांवर घंटागाडीचे कर्मचारी जाऊन कचरा संकलित करीत नाहीत. त्यामुळे अशा व्यापारी संकुलांतून मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहतो. या कच-याचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून दर दोन-चार दिवसांनी कचरा जाळला जातोय. विशेष म्हणजे हा कचरा सर्वच प्रकारचा असतो. त्यामुळे कच-याला आग लागताच ठसका सुरु होतो. धुराचे लोळ रात्रभर उठलेले असतात. नागरिक आपापल्या घरी रात्रीच्या झोपेत असतात. परंतु त्यांच्या श्वाच्छोश्वासाद्वारे प्रदूषित हवा फुफ्फुसात जाते. त्यामुळे धाप लागणे, ठसका उठणे, छातीत जळजळ करणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. मात्र याबाबत उघडपणे कोणी बोलत नाही किंवा कचरा जाळणा-यांवर कोणी कारवाईही करीत नाही. नागरिकांच्या आरोग्याला वेठीस धरणा-या या प्रवृत्तीला आळा घालणे आवश्यक आहे.

COMMENTS