Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

रेणापूर प्रतिनिधी - शेतक-यानी मागणी केल्याप्रमाणे रेणा मध्यम प्रकल्पातून शुक्रवारी धरणाचे 4 दरवाजे 10 सें.मी.ने उघडण्यात आले. रेणा नदी पात्रात 2

चोरीस गेलेल्या पिकअपसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा
रस्त्याच्या मागणीसाठी कारेगाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न

रेणापूर प्रतिनिधी – शेतक-यानी मागणी केल्याप्रमाणे रेणा मध्यम प्रकल्पातून शुक्रवारी धरणाचे 4 दरवाजे 10 सें.मी.ने उघडण्यात आले. रेणा नदी पात्रात 29.04 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्याने नदीवरील रेणापूर, घनसरगाव व खरोळा हे तीन बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. या पाण्यामुळे ऊस व उन्हाळी पिकांना पाणी उपलब्ध होणार असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
या वर्षी धरणात मुबलक साठा झाला होता त्यामुळे तब्बल 11 वेळा धरणातून रेणा नदी पात्रात पाणी सोडावे लागले होते. पाणी सोडण्याची ही बारावी वेळ आहे. रेणा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या शेतक-यांंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आत्तापर्यंत धरणातून 10 दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच अनेक वेळा पाणी सोडावे लागले आहे. धरणात पाण्याचा ओघ वाढत गेल्याने धरणाचे कधी दोन कधी चार तर कधी सहा दरवाजे 10 सेंमी ने उघडले गेले. जून महिण्यात दोनदा, ऑगष्टमध्ये एकदा, सप्टेंबरमध्ये 5 वेळा तर ऑक्टोबरमध्ये 4 वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आता ही बारावी वेळ आहे. असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. रेणा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. नदीवरील घनसरगाव, रेणापूर व जवळगा (खरोळा) हे तीन्ही बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. सोडलेल्या पाण्याचा उपयोग ऊस व उन्हाळी पिकांना तसेच जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे.

COMMENTS