Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा महेश भुषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्कारांनी सन्मान

लातूर प्रतिनिधी - माहेश्वरी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक समाजबांधवांनी समाजासाठी अतुलनिय योगदान दिले आहे. अशा कर्तृत्ववान समा

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची पंचक्रोशीत चर्चा
सांगलीत लम्पीचा धोका वाढला
लातुरात 78 बँक कर्मचार्‍यांनी केले रक्तदान

लातूर प्रतिनिधी – माहेश्वरी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक समाजबांधवांनी समाजासाठी अतुलनिय योगदान दिले आहे. अशा कर्तृत्ववान समाजबांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दि. 28 मे रोजी शहरातील दयानंद सभागृहात पार पडलेल्या गौरव सोहळ्यात ‘महेश सेवा’ पुरस्काराने नंदकिशोरजी सारडा, प्रेमकिशोरजी मुंदडा आणि विष्णूजी भुतडा यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ‘महेश गौरव’ पुरस्काराने ईश्वरजी बाहेती आणि प्रा. डॉ. गोपाल बाहेती यांना तर ‘महेश भूषण’ पुरस्काराने डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांना सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सदस्य जुगलकिशोर लोहिया होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा उपाध्यक्ष राजकुमार पल्लोड, वक्ते अनिल राठी (अमरावती), नंदकिशोर तोतला, सीए. प्रकाश कासट, बालकिशन मुंदडा, हुकमचंद कलंत्री, फुलचंद काबरा, विजयकुमार चांडक, चांदकरण लड्डा, सत्यनारायण हेड्डा, नंदकिशोर लोया, ईश्वर बाहेती, गोविंद कोठारी, अनिता मालू, राजेशकुमार मंत्री, ओमप्रकाशजी सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसदन सोनी, विष्णुप्रसाद सारडा, गोकुळदास चांडक, जगदीश भूतडा, मंगल लड्डा, दीपक बजाज, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महेश पूजन आणि महेश वंदनाने करण्यात आली. प्रस्ताविक प्रकाश कासट यांनी केले. पुरस्काराचे वाचन हुकमचंदजी कलंत्री आणि सत्यनारायणजी हेड्डा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ईश्वरप्रसाद बिदादा यांनी तर आभार फुलचंदजी काबरा यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने माहेश्वरी समाजबांधवांची उपस्थिती होती.

COMMENTS