Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्हयातील शाळा दि. 15 जून पासून सुरू होणार आहेत. जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 3 लाख

देवदर्शनासाठी निघालेले चार मित्र अपघातात ठार
मुक्रमाबाद येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
इर्शाळवाडीतील 57 बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्हयातील शाळा दि. 15 जून पासून सुरू होणार आहेत. जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 3 लाख 10 हजार 434 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी 12 लाख 89 हजार 687 पाठयपुस्तकांचे मोफत वितरण होणार आहे. आज पर्यंत जिल्हयात 60 टक्के पाठयपुस्तकांचे तालुका स्तरावर वितरण झाले आहे. उर्वरीत पाठयपुस्तके चार ते पाच दिवसात तालुका स्तरावर पुरवठा होणार आहेत.
समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण विभाग लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता 1 ली ते 8 वीच्या मनपा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय, खाजगी अनुदानित शाळेतील 3 लाख 10 हजार 434 विद्यार्थ्यांना मराठी व उर्दु भाषेची बालभारतीची 12 लाख 89 हजार 687 पाठय पुस्तके मोफत मिळणार आहेत. तशी सर्व तालुका स्तरावरून ऑनलाईन पाठयपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीच्यावतीने जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर पाठय पुस्तकांचे वितरण होत आहे. या पाठयपुस्तकांचे वितरण 19 मे पासून लातूर जिल्हयात तालुका स्तरावर होत आहे. आजपर्यंत 60 टक्के पाठयपुस्तकांचे वितरण झाले आहे. तालुका स्तरावरून गट शिक्षणाधिकारी यांच्या नियोजनानुसार शाळा स्तरापर्यंत पुस्तके पोहचविली जाणार आहेत. यावर्षी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे पाठय पुस्तके 4 भागात विभागली आहेत. पाठय पुस्तकातच कोरे पेज जोडण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी असणार आहे. जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेच्या पहिल्या दिवशी 3 लाख 10 हजार 434 विद्यार्थ्यांना 12 लाख 89 हजार 687 पुस्तके मोफत मिळणार आहेत.

COMMENTS