प्रशासनाला जाग येण्यासाठी  स्वयंसेवी संस्थाचा कँडल मार्च

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासनाला जाग येण्यासाठी स्वयंसेवी संस्थाचा कँडल मार्च

अहमदनगर/प्रतिनिधी-प्रशासनाने केलेल्या आपत्कालीन कक्षातील फोन उचलले जात नाहीत, लस-इंजेक्शन्स-ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे, रुग्णांना बेड मिळत नाही, अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाला जाग येण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर कँडल मार्च नेला.

भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी
डेंग्यूच्या साथीने कोपरगावकर त्रस्त, उपाययोजना करा ः विवेक कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी-प्रशासनाने केलेल्या आपत्कालीन कक्षातील फोन उचलले जात नाहीत, लस-इंजेक्शन्स-ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे, रुग्णांना बेड मिळत नाही, अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाला जाग येण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर कँडल मार्च नेला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे अ‍ॅड. श्याम आसावा व स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चातील सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर ठाण मांडले. 

रुग्णांना दिलासा मिळू शकत नाही, प्रशासन हतबल झालेले आहे, इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, ऑक्सिजन तुटवडा आहे व असे असतानाही प्रशासन ठप्प आहे, असा आरोप स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये करण्यात आला. नंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना स्नेहालयचे डॉ. कुलकर्णी म्हणाले, नगर जिल्ह्यातील रुग्णांना उपचार मिळू शकत नाही, इंजेक्शन व ऑक्सिजनचा काळाबाजार सुरू आहे. अनेक रुग्णांचे हाल होत आहे. पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांना सुविधा मिळू शकत नाही. अनेक रुग्ण उपचार न मिळाल्यामुळे दगावले आहे, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील सगळी व्यवस्था सुरळीत करा, दोन दिवसात 40 वेळा आपत्कालीनचा फोन लागला नाही, रिंग जाऊन उचलला नाही व रात्री फोन उचलला आणि म्हणतात, आमच्याकडे फक्त नावे-पत्ते नाही, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. सर्व ऑनलाईन व पारदर्शक केल्यास यातला काळाबाजार थांबेल. तसे होत नसल्याने हॉस्पिटल व मेडिकलला रुग्णांची लूटमार करण्याची संधी दिली जात आहे. सामान्य माणसांनी कुठे जायचे? त्याला रक्कम मोजावी लागते व अधिकार्‍यांना हे कळत नाही याचे दुर्दैव आहे. म्हणून अधिकार्‍यांना जाग यावी व त्यांच्या डोक्यात काहीतरी जनतेचा विचार यावा म्हणून कॅण्डल लाईट मार्च काढलेला आहे. हा संघर्षाचा काळ नाही व समजुतदारपणाने सर्वांची मदत घेऊन सर्व पारदर्शक करून लोकांना न्याय द्या, असे अ‍ॅड. शाम आसावा यावेळी म्हणाले.

COMMENTS