Homeताज्या बातम्यादेश

चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना

नवी दिल्ली : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्ता प्रकल्प सुकाणू समिती स्थापन केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांबरोबर

कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती व जनसंपर्कच्या नाशिक टीमचे कार्य कौतुकास्पद : डॉ. दिलीप पांढरपट्टे
अ‍ॅमेझॉन देणार कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्ता प्रकल्प सुकाणू समिती स्थापन केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांबरोबर आणि वन विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला होता. या सुकाणू समितीचे अध्यक्षपद नवी दिल्लीच्या ग्लोबल टायगर फोरमचे सरचिटणीस डॉ. राजेश गोपाल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. देशभरातील विविध ठिकाणचे वन्य जीव अभ्यासक, तसेच वन्य प्राणी विभागाचे अधिकारी  म्हणून कार्यरत असलेल्या आणखी 10 जणांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.  याचबरोबर ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांबरोबर सल्ला मसलती साठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सल्लागार पॅनेल मध्ये दक्षिण अफ्रिकेतील तीन आणि नामिबियातील एका  वन्य जीवअभ्यासकाचा समावेश करण्यात आला आहे.

COMMENTS