Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक

मुंबई/प्रतिनिधी ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामे झाली पाहिजेत. मात्र घटक प

अवधूत गुप्तेच्या घरात माकडाचा धुमाकूळ
भरचौकात दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड ; पाहा व्हिडिओ I LOKNews24
ऐन सणासुदीत भाजीपाल्यांचे दर भडकले

मुंबई/प्रतिनिधी ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामे झाली पाहिजेत. मात्र घटक पक्षाला सापत्न वागणूक मिळत असल्याचे मोठे वक्तव्य शिंदे गटाचे नेते गजाजन कीर्तिकर यांनी केले आहे. ज्यावेळी सत्तासंघर्ष झाला त्यावेळी आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. भाजप आणि आम्ही एकत्र मिळून आमचे सरकार आहे. त्यामुळे आता आम्ही एनडीएचा भाग आहोत. त्यामुळे आता आमची कामे झाली पाहिजे. मात्र येथे आम्हाला सापत्न वागणूक मिळते अशी नाराजी गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.
मागील निवडणुकीत शिवसेनेने ज्या 22 जागा लढवल्या होत्या, त्या पुन्हा लढवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. सध्या आम्ही 22 जागा लढवण्याची तयारी करत आहोत, आमचे सर्व 13 विद्यमान खासदार यासाठी तयारी करत आहेत. राहुल शेवाळे म्हणाले, ठाकरे गटाकडे जे खासदार आहेत त्यांनाही आम्ही आमच्याकडे आणायचा प्रयत्न करतोय. ज्या चार जागा आम्ही हरलो होतो, तिथे निरिक्षक पाठवून आढावा घेणार आहोत. गजानन किर्तीकर काय बोलले माहिती नाही. अशी माहितीही त्यांनी दिली आहे. विरोधकांचा विरोध हा दुर्दैवी आहे. संपूर्ण कार्यक्रम लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत होतो. त्यांना संसदीय कामकाजाची माहिती आहे का? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. त्यांचे विचार ऐकले नाहीत. आता त्यांच्यासोबत नवीन बाळासाहेब आंबेडकर आहेत. किमान त्यांचा तरी सल्ला त्यांनी मानावा. संजय राऊत यांनी आमच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे पीएम पदाचा चेहरा असतील असे सांगितले होते, आता ते राहुल गांधी यांना पीएम पदाचा चेहरा मानत असतील हे दुर्दैव आहे, असा टोला देखील त्यांना लगावला. भाजप आणि शिवसेनेते मतभेत निर्माण झाले आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सोबतच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे.

शिंदे सेनेचा लोकसभेच्या 22 जागांवर दावा- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आम्ही 22 जागा लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली आहे. एकीकडे भाजप राज्यात संपूर्ण जागा लढवण्याची तयारी करत असताना आता शिंदे गटाने देखील जोर लावायला सुरुवात केली आहे. युतीत आपल्या वाट्याला अधिक जागा याव्या यासाठी शिंदे गटांकडून जोर लावला जात आहे. गजानन कीर्तिकर यांनी भाजपमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्हटले होते, तर दुसरीकडे राहुल शेवाळे यांनी 22 जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती दिली आहे. खासदार राहूल शेवाळे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.

COMMENTS