Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया २५ नंतर

जि.प.च्या शिक्षण विभागाची माहिती

नाशिक-  बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवेश २५ मे नंतर सुरू होण

चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार… काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं… (Video)
सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
न्यायव्यवस्थाच बुडाखाली घेण्याचा डाव

नाशिक-  बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवेश २५ मे नंतर सुरू होणार आहेत. निवड यादीतील प्रवेशांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे अद्याप प्रवेशप्रक्रिया स्थगित असल्याची माहिती जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

शिक्षण संचालनालयामार्फत १३ एप्रिलपासून निवड यादीतील विद्याथ्र्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये ३ हजार १५७ विद्याथ्र्यांचे, तर राज्यभरात ६३ हजार ९२१ विद्याथ्र्यांचे प्रवेश ‘आरटीई’ अंतर्गत निश्चत झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी २२ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच याच कालावधीत ज्या विद्याथ्र्यांची कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, त्यांची कागदपत्रे जमा करण्याची मुदतही देण्यात आली होती. या कालावधीत निश्चित झालेल्या प्रवेशांची छाननी प्रक्रिया सुरू असून, आजअखेर (२५) मे राजी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यावरून किती प्रवेश निश्चित झाले व किती जागा रिक्त आहेत, यांची अंतिम संख्या समजणार आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

कागदपत्रांवर प्रवेश निश्चिती – काही वर्षांच्या तुलनेत प्रवेश पडताळणीसमोर आलेल्या कागदपत्रांमध्ये यंदा अनेक अडचणी आल्या. जात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता आलेले नव्हते. अशा विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून कागदपत्रे जमा करण्याची सूचना देण्यात आली होती. यापैकी जे विद्यार्थी त्रुटीरहित कागदपत्रे जमा करतील त्यांचेच प्रवेश निश्चित होतील. बाकीच्यांचे प्रवेश निश्चित होणार नाहीत

COMMENTS