Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पाण्याचा गैरवापर केल्यास तुमच्यावर होणार कारवाई

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामध्ये 32 टक्के पाणी सध्या शिल्लक असून त्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका पाण्य

पशुपालकांनी लम्पी पासून सुरक्षिततेसाठी आजारी पशू विलगीकरणासह लसीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामध्ये 32 टक्के पाणी सध्या शिल्लक असून त्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका पाण्याचे नियोजन करताना दिसून येत आहे.

नवी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात गाड्या धुणे, नळ चालू ठेवणे, तसेच  पाण्याच्या टाक्या ओवर फुल होणे, असे प्रकार सध्या नवी मुंबई शहरांमध्ये घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेकडून अशा सोसायटींवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने 336 सोसायटी यांना नोटीसा पाठवलेल्या आहेत.

त्या मध्ये सोसायटीची आकडेवारी  – वाशी   75 कोपरखैरणे 55 तुर्भे 10 बेलापूर 60 नेरूळ 15 घनसोली 30 ऐरोली 08 दिघा 80

नवी मुंबईकरांना पाणी वापरण्यासाठी पालिकेने पाणीपुरवठा ठरवून दिलेला आहे. त्यामुळे जास्त पाणीपुरवठा वापरल्यास त्यांच्यावर  प्रशासनाकडून कारवाई  केली जाते, अशाच प्रकारे 336 सोसायटींवर कारवाई प्रशासन करत आहे. 

COMMENTS