Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘विजय 69’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनुपम खेर जखमी

मुंबई प्रतिनिधी - अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका करून त्यांनी आपली ख

संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध का ?
अहमदनगर जिल्ह्यातील 96 महसुली मंडळाचा दुष्काळी गावांमध्ये समावेश
सचिव सुमंत भांगेंना अभय देण्यामागे कुणाचा वरदहस्त ?

मुंबई प्रतिनिधी – अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका करून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. वर्षानुवर्षे अनुपम खेर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत आहेत. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. अनुपम खेर नुकतेच चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याने स्वतः पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अनुपम खेर नुकतेच त्यांच्या आगामी ‘विजय 69’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. याच चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान अनुपम खेर जखमी झाले. अनुपम यांनी सोमवारी सकाळी इन्स्टाग्रामवर हात फॅक्चर असलेला एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हाताला फॅक्चर असलं तरी कॅमेरासमोर पोज देताना अनुपम खेर यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. अनुपम यांनी पोस्टमध्ये खुलासा केला की, “तुम्ही एका स्पोर्ट फिल्ममध्ये काम करताय आणि तूम्हाला काही दुखापत होणार नाही असं कसं होऊ शकतं? दुखत आहे, पण जेव्हा हे स्लिंग खांद्यावर ठेवणाऱ्याने सांगितले की, त्याने शाहरुख खान आणि हृतिक रोशनवर सुद्धा हे उपचार केले आहेत, तेव्हा माझं दुखणं जरा कमी झालं.” अनुपम पुढे म्हणाले, “मी जरा जोरात खोकलो, तर माझ्या तोंडातून एक छोटीशी किंकाळी नक्कीच बाहेर पडते! पण या फोटोत हसण्याचा प्रयत्न खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग पुन्हा सुरू होईल.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत

COMMENTS