Homeताज्या बातम्यामनोरंजन

रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही – भरत जाधव

कोकण हे निसर्गरम्य आणि पर्यटनांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना कोकणात फिरायला जायला खूप आवडतं. कोकणातील प्रसिद्ध

काळे परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य
आर्थिक वर्ष २०२३ साठी IWNBP मधील आघाडीच्या ३ खाजगी जीवन विमा कंपन्यांमध्ये टाटा एआयएचा समावेश
इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 

कोकण हे निसर्गरम्य आणि पर्यटनांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना कोकणात फिरायला जायला खूप आवडतं. कोकणातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे रत्नागिरी…पण या रत्नागिरीत पुन्हा नाटकाचे शो करणार नाही असा निर्धार अभिनेता भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं अशी घोषणा करण्यामागे काय घडलं. भरत जाधव एवढे नाराज का झाले हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. कलाप्रेमी म्हणून रत्नागिरीची ओळख पण याच कलानगरीत भरत जाधव यांनी पुन्हा नाटक करणार नाही अशी घोषणा केली. झालं असं की भरत जाधव यांनी नाट्यगृहांची अवस्था चव्हाट्यावर आणली आहे. मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत. एवढंच नाही तर साऊंड सिस्टिंमवरून त्यांनी खेद व्यक्त केला आहे. शनिवारी रत्नागिरीत तू तू मी मी या नाटकाचा प्रयोगावेळी भरत जाधव यांनी ही समस्या मांडली आणि परत रत्नागिरीत पाय ठेवणार नाही अशी घोषणाच केली. नाटक सुरु असतानाच भरत जाधव प्रेक्षकांना म्हणाले की, “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा” ”नाट्यगृहाची अशी अवस्था असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता”, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत, पुन्हा रत्नागिरीत शो करणार नाही, असं सांगितलं.  एखाद्या कलाकारावर असे प्रयोग थांबून नाट्यगृहाची अवस्था अशी चव्हाट्यावर मांडण्याची वेळ यावी, असे अतिशय दुदैवी गोष्ट आहे. भरत जाधव यांच्या घोषणेनंतर तरी सांस्कृतिक मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाग येईल का? हे बघावं लागेल. पण रत्नागिरीकरांसाठी ही अशी नामुष्की आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

COMMENTS