Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

इस्त्रोच्या चांद्रयान-3 ची तयारी अंतिम टप्प्यात

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 लाँच करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हे यान यूएन

किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
भोंगा वाजला की टीव्ही-मोबाईलसह इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 लाँच करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हे यान यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार असून ते कधी प्रक्षेपित केलं जाईल याबाबतही स्पष्टता आली आहे. इस्रोच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. लँडिंग साईटच्या आसपास चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ते वैज्ञानिक उपकरणांसह जाईल.
इस्रो अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार जर सर्व काही नियोजित पद्धतीने होत गेल्यास चांद्रयान-3 जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात प्रक्षेपित केले जाईल. यावर्षी मार्चमध्ये चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाशी निगडीत आवश्यक त्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक अप्पर स्टेजला शक्ती देणार्‍या सीई-20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती हीट चाचणी यशस्वी झाली आहे. लँडरची मोठी चाचणी ईएमआय/ईएमसी देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. चांद्रयान-3 भारताच्या चांद्रयान मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा हा पुढील टप्पा आहे. जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि त्याची चाचणी करेल. ते चांद्रयान-2 सारखेच असेल. यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असणार आहे. चंद्र मोहिमेतील तिसरे अंतराळ यान भारताच्या सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-एके-खखख मधून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. दरम्यान, चांद्रयान-3 चे प्रथम उद्दिष्ट यशस्वीरित्या लँडिंग करण्याचे आहे. त्यासाठी नवीन साधने तयार करणे, चांगला अल्गोरिदम तयार करणे, तसेच अपयशी पद्धतींची काळजी घेणे यासह बरेच काम केले जात आहे.

COMMENTS